Farmer leaders were telling Thanedar to remove the mask 
विदर्भ

शेतकरी नेते किशोर तिवारी म्हणाले, ‘मास्क काढा, फोटोत तुम्ही कोण आहात, ते कुणाला ओळखू येणार नाही!’

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : सर्वत्र कोरोनाचा उपद्रव सुरू आहे. सामाजिक जीवनात वावरत असताना मास्क वापरणे किती आवश्‍यक आहे, हे जनतेला सांगण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सामाजिक संघटनाही या कामी सरसावल्या आहेत. परंतु, स्वतः शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात स्वतः मास्क तर घातलाच नाही. पण पांढरकवड्याचे ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनाही घातलेला मास्क काढायला सांगितला. काय तर म्हणे, फोटोत तुम्ही कोण आहात, ते कुणाला ओळखू येणार नाही.

एकंदरीत काय तर कोरोना गेला खड्ड्यात पण छटाकभर कार्यक्रमाची प्रसिद्धी आम्ही घेणारच, असाच एकंदर पवित्रा श्री तिवारींचा एका कार्यक्रमात बघायला मिळाला. पण शेतकरी नेत्यांनी सांगूनही ठाणेदारांनी आपला मास्क काढला नाही आणि शासनाच्या कोरोनासंबंधी असलेल्या नियमाचे पालन केले. त्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

तिवारींसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात आणि इतर वेळीही कोरोनासंबंधातील सर्व नियमांचे स्वतः पालन करून इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करणे अपेक्षित आहे. पण स्वतः नियमाची ऐसीतैसी करून इतरांनाही नियम तोडायला सांगताना ते दिसले. त्यांचा हा व्डिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होतोय आणि त्यांच्या बेजबाबदार वागण्याबद्दल लोक आश्‍चर्य व्यक्त करत आहेत.

हा प्रकार अनेकांना विचार करायला लावणारा

जिल्ह्यातील पांढरकवडा येथे कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गरजू रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. त्यामुळे व्यापारी संघटनेने कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. व्यापाऱ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गांधी जयंतीदिनी व्यापारी संकुलात एका समारंभात सिलिंडरचे लोकार्पण करण्यात आले. त्या कार्यक्रमात घडलेला हा प्रकार अनेकांना विचार करायला लावणारा आहे.

ही गोष्ट अनेकांना रुचलेली नाही

काही ठिकाणी लोक प्रशासनाची विनंती ऐकत नाहीत, म्हणून मास्क न घातल्यास दंडसुद्धा आकारण्यात येतो आहे आणि शेतकरी नेते चक्क पोलिस अधिकाऱ्यालाच घातलेला मास्क काढायला सांगतात, ही गोष्ट अनेकांना रुचलेली नाही.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT