Farmer who is missing found in hotel in Amravati district  
विदर्भ

आत्महत्येची चिठ्ठी लिहून गायब असलेला शेतकरी अखेर सापडला; पोलिसांची ४ पथकं घेत होती शोध 

ओमप्रकाश कुऱ्हाडे

शिरजगाव (जि, अमरावती)  : देऊरवाडा येथील शेतकरी विजय सुखदेव सुने (वय ४०) हे सोमवारी (ता. ११) रात्रीपासून बेपत्ता झाले होते. आत्महत्येच्या उद्देशाने घर सोडत असल्याची चिठ्ठी घरात सापडल्याने देऊरवाडा व शिरजगावकसबा येथील त्यांच्या नातेवाइकांसह परिसरात खळबळ उडाली होती. 

पोलिसांनी त्यांच्या शोधार्थ 4 पथके पाठविली होती. अशातच ते शिरजगावकसबा येथील एका हॉटेलमध्ये बुधवारी दुपारी दिसले. त्यामुळे कुटुंबियांसह पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

विजय सुने यांची पत्नी वैशाली यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. अब्दागिरे यांनी श्री. सुने यांचा शोध घेण्यासाठी 4 पोलिस पथके रवाना करण्यात आली होती. त्यांनी शेगाव, दर्यापूर, अंजनगाव आदी ठिकाणी त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडून आले नाही. अशातच विजय सुने हे बुधवारी (ता. १३) शिरजगावकसबा येथीलच एका हॉटेलमध्ये दिसून आल्याचे ठाणेदार सचिन परदेशी यांनी सांगितले. 

पोलिसांनी श्री. सुने यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले, की मी शेतीप्रकरणाला घेऊन तणावात होतो. त्यामुळे शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेलो होतो, अशी माहिती ठाणेदार परदेशी यांनी दिली. तथापि, संपूर्ण चौकशी करून विजय सुने यांना त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे ठाणेदार सचिन परदेशी यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT