Farmer in Yavatmal district committed suicide
Farmer in Yavatmal district committed suicide 
विदर्भ

तुम्हीच सांगा याला शेतकरी आत्महत्या म्हणायची का? मुलाला शिक्षणासाठी मोबाईल घेऊन देता न आल्याने बळीराजाने मृत्यूला कवटाळले...

गणेश राऊत

नेर (जि. यवतमाळ) : महाराष्ट्रासाठी शेतकरी आत्महत्या हा विषय तसा नव नाही. मात्र, बारावीतील मुलाला ऑनलाइन शिक्षणासाठी ऍड्रॉइड मोबाईल विकत घेऊन देऊ न शकल्याचे शल्य अनावर झाल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केली. तशी ही घटना विरळच. किंबहुना, ही राज्यातील पहिली घटना असावी. या घटनेकडे शेतकरी आत्महत्या म्हणून सरकारने डोळेझाक केली. 

तालुक्‍यातील बाणगाव येथील ही घटना आहे. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे नुकतेच दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेलेत. मात्र, त्यांच्या कानापर्यंत प्रशासनाने हा विषय पोहोचू दिला नाही. कारण, शेतकऱ्याच्या मृत्यूचे आता कुणाला सुतक राहिलेले नाही, हेच ही घटना सांगून जाते. 

नेरपासून आठ किलोमीटर अंतरावर बाणगाव हे तेराशे लोकसंख्येचे गाव आहे. या गावात बाबूजी महाराज यांचे प्रसिद्ध देवस्थान आहे. येथील शेतजमीन सुपीक आहे. याच गावातील दीपक ऊर्फ संजय किसन गायनर या शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. महसूल प्रशासनाने दुबार पेरणीचे संकट, घरी पडून असलेला कापूस व कर्जबाजारीपणा आदी कारणांचा उल्लेख तलाठी अहवाल केला आहे.

एरव्ही, शेतकरी कर्जबाजारीपणामुळे, नापिकी, दुष्काळ किंवा सावकाराने नागवल्यामुळे आत्महत्या करतात. परंतु, या आत्महत्येमागील खरे कारण काही वेगळेच आहे. बारावीत असलेल्या आपल्या मुलाला ऑनलाइन शिकवणीसाठी अँड्रॉईड मोबाईल घेऊन देणे शक्‍य नसल्यामुळे एका भावनाप्रधान शेतकरी बापाला अतीव दु:ख झाले. त्यातूनच त्याने आत्महत्या केली. 

हे जाणून घेण्यासाठी प्रस्तूत प्रतिनिधीने बाणगाव येथे प्रत्यक्ष अनेकांची भेट देऊन आत्महत्येचे नेमके कारण जगापुढे आणण्याचा प्रयत्न केला. तसे बघितले तर ही घटना कोरोना संकटाचासुद्धा बळी आहे. कोरोनाचे वैश्‍विक संकट सर्वत्र गडद झाले आहे. याची झळ समाजातील सर्वच घटकांना बसली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शाळा, महाविद्यालये सुरू करणे शक्‍य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने ऑनलाइन शिक्षणपद्धतीचा अवलंब केला आहे. 

या ऑनलाइन शिक्षण पद्धतीचे अनेक चांगले-वाईट परिणाम मुलांवर होत आहेत. या पद्धतीचा राज्यातील पहिला बळी नेर तालुक्‍यातील बाणगाव येथील शेतकरी गेला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या एका पालकाला आपल्या मुलाला मोबाईल घेऊन देणे शक्‍य न झाल्यामुळे त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

दीपक ऊर्फ संजय किसन गायनर असे त्या वैफल्यग्रस्त पित्याचे नाव आहे. दीपक गायनर यांच्याकडे वडिलोपार्जित आईच्या नावाने असलेली सात एकर शेती आहे. त्यातील निम्मे शेत लहान भावाचे तर निम्मे दीपकच्या वाट्याला आले आहे. लहान भाऊ ज्ञानेश्‍वर गायनर हा पुणे येथे राहतो. दीपकचे कुटुंब छोटे आहे. त्यात पत्नी वर्षा, मोठा मुलगा यश, लहान मुलगा ओम आदींचा समावेश आहे. 

गेल्या वर्षी दीपक यांनी शेतात कपाशीचे पीक घेतले. सर्व शेतजमीन दीपक कसत असला तरी ती रेकॉर्डवर आई सुमन हिच्या नावाने आहे. सुमन यांचे आधार लिंक नसल्यामुळे त्यांना कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नंबर लावता आला नाही. त्यामुळे मागील वर्षी घाम गाळून कष्टाने पिकविलेल्या कापूस तसाच घरात पडून आहे. हा कापूस विकून लोकांचे देणे देता येईल असे दीपकला वाटत होते. 

परंतु, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत त्याला ते शक्‍य झाले नाही. त्याने गावातील खासगी सावकाराकडून पाच टक्के व्याजाने हजारांचे कर्ज घेतले. पत्नी वर्षाने फायनान्स कंपनीकडून महिला गटाच्या नावावर हजारांचे कर्ज घेतले आहे. या दोन्ही कर्जाच्या हप्त्याचा तगादा मोठ्याप्रमाणात सुरू होता. त्यातील खासगी सावकाराचे पाच टक्‍के व्याजाचे कर्ज व गटाचे टक्‍क्‍यांनी घेतलेले कर्ज यामुळे प्रचंड आर्थिक ताण निर्माण झाला होता.

दर महिन्याला गटाचा चार हजार रुपये हप्ता भरावा लागत होता. त्यासाठी पैसे आणायचे कोठून, असा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला होता. सोबतच मध्ये हजार रुपयांचे स्टेट बॅंकेचे कर्ज काढले होते. सदर कर्ज माफ होईल, असे दीपकला वाटत होते. कर्जमाफ झाल्यावर आपण पुन्हा नव्या दमाने शेती करून आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवू, असे स्वप्न तो उराशी बाळगून होता, असे दीपकच्या पत्नीने सांगितले. 

गावालगतच्या धरणावरून शेताशेजारच्या अनेक शेतकऱ्यांनी पाणी घेऊन आपली जमीन ओलीताखाली आणली. मात्र, दीपकला पाइपलाइन टाकणे शक्‍य झाले नाही. यावर्षी उसणेउधार करीत त्याने चार एकरांत सोयाबीन व उर्वरित शेतात कपाशी पेरली. यात महाबीज, सारस व ईगल कंपनीचे सोयाबीन पेरले. राशी या वाणाचे कपाशीचे बियाणे पेरले. परंतु सोयाबीन टक्‍के उगवले, तर कपाशी केवळ दहा टक्‍केच उगवली. त्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले. 

परिस्थितीशी झुंज देत दीपक यांनी आपल्या मित्राकडून हजार व मेव्हणीकडून पाच हजार रुपये उसने घेतले. दुबार पेरणी केली. दुबार पेरणी साधली, आता पीक डोलायला लागले होते. मोठा मुलगा यश हा नेर येथील सावित्रीबाई फुले महाविद्यालयात यंदा बारावीला शिकत आहे. त्याच्या शाळेचे ऑनलाइन क्‍लासेस सुरू झाले आहे. आपला मुलगा शिक्षणात मागे राहू नये, आपल्यासारखेच काबाडकष्ट त्याच्या नशिबी येऊ नये, म्हणून त्याला खूप शिकवायचे स्वप्न दीपकने बघितले होते. 

ऑनलाइन क्‍लासकरिता ऍण्ड्राइड मोबाईलची गरज आहे. मुलाने ऍण्ड्राइड मोबाईल घेऊन मागितला. परंतु मोबाईल विकत घेण्यासाठी आता पैसे आणायचे तरी कुठून? गावातील अनेकांकडून आधीच उधार घेतले आहेत. त्यांचे कर्ज फेडायचे कसे? आदी प्रश्‍न दीपकच्या मनात घर करू लागले. त्याने गावातील काही जवळच्या व्यक्तींकडे ऍण्ड्राइड मोबाइलची मागणी केली. परंतु, कोणीही होकार दिला नाही.

धीर व आधार देण्याची गरज

एव्हाना त्यांना आपल्या मुलांचे शैक्षणिक भविष्य अंधारात असल्याची जाणीव झाली. मोबाईल नसला तर मुलाला शिकता येणार नाही. आपण मुलाला एक साधा दहा हजारांचा मोबाईल विकत घेऊन देऊ शकत नाही. हे दु:ख त्यांना अनावर झाले आणि एका बेसावध क्षणी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्राच संपविण्याचा निर्णय घेतला. या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सावरण्यासाठी धीर व आधार देण्याची गरज आहे. 

जि. प. सदस्य मसराम यांनी घेतली भेट

शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य भरत मसराम यांनी या कुटुंबाची मंगळवारी (ता. सात) या कुटुंबाची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कुटुंबाचे वास्तव जाणून घेतले. घरात पडून असलेल्या कापसाच्या नोंदणीची व विक्रीची जबाबदारी घेतली. 

संपादन - नीलेश डाखोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अमित शहांनी बोरिवलीमध्ये भाड्याने घर घेतलंय- संजय राऊत

IPL 2024 DC vs RR : राजधानी 'दिल्ली'साठी आर या पार...! प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी आज राजस्थानवर विजय आवश्यक

SCROLL FOR NEXT