Farmers are facing crisis of double sowing 
विदर्भ

...अन्यथा बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन पिकाची लागवड केली. परंतु, अनेकांच्या शेतात सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना एकतर सोयाबीन बियाणे बदलून द्यावे किंवा त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिला.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनचा पेरा वाढविला आहे. परंतु, महाबीजसह अनेक कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. याबाबत जिल्हा कृषी विभागाकडे शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा शेतकऱ्यांकडून आरोप होत आहे. या सर्व तक्रारींची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, खासगी सचिव रवींद्र पवार, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी राजेंद्र घोंगडे, तसेच बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात नऊ लक्ष दोन हजार हेक्‍टरपैकी जवळपास अडीच लक्ष हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड होते, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, ज्या शेतकऱ्यांचे बियाणे पेरणीनंतर उगवले नाही, त्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे बिलासहित अर्ज करावे. महाबीजच्या धर्तीवर संबंधित कंपन्यांनी बियाणे बदलवून द्यावे किंवा स्वत:च्या सीएसआर फंडामधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा मोबदला द्यावा. मात्र, असे न करणाऱ्या बियाणे उत्पादक कंपन्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येतील. यापुढे न उगवलेल्या बियाण्यांबाबत एकाही शेतकऱ्याची तक्रार येता कामा नये, असेही ते यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी सिंह यांनी सोयाबीन उत्पादक बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन माहिती घ्यावी. जिल्ह्यात एकूण विकलेल्या बियाण्यांपैकी किती टक्के बियाणे वांझ निघाले, याचे अहवाल दोन दिवसांत सादर करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बैठकीला सारस, इगल, ऋची, अंकुर, ग्रीनगोल्ड या सोयाबीन बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fox Attack in Kolhapur : भरवस्तीत कोल्ह्याचा धुमाकूळ; नागरिकांवर हल्ला, थरारनाट्यानंतर पकडलेल्या कोल्ह्याचा मृत्यू

Ghati Hospital : डॉक्टरांच्या प्रयत्नांनी मृत्यूला हरवले! विषबाधेच्या रुग्णाचे तीन महिन्यांनंतर निघाले व्हेंटिलेटर

Digital Census India : देशातील पहिली 'डिजिटल' जनगणना! राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Navi Mumbai Airport: दोन दिवसांत 10 हजार प्रवाशांचा प्रवास, नवी मुंबई विमानतळाला नागरिकांची पसंती

Solo Travel For Women: महिलांनो, नवीन वर्षात सोलो ट्रिप प्लॅन करताय? ही आहेत भारतातील ७ सुरक्षित आणि निसर्गरम्य ठिकाणे

SCROLL FOR NEXT