farmers get low prices for soyabean in amravati 
विदर्भ

सोयाबीन विक्री सुरू, पण ऐन सणासुदीच्या तोंडावर हमीभावापेक्षाही मिळतोय कमी दर

कृष्णा लोखंडे

अमरावती : यंदाच्या खरिपातील नवीन सोयाबीनची आवक बाजार समितीत सुरू झाली असून पहिल्या 10 दिवसात 78 हजार 667 पोत्यांची आवक नोंदवली गेली. दसरा-दिवाळीच्या तोंडावर ही आवक होत असून हमीभावापेक्षा कमी भाव सध्या मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाची हमी नसल्याचे चित्र आहे. आर्थिक निकडीपायी शेतकऱ्यांनी त्यातही समाधान मानले आहे. सोमवारी (ता.12)मात्र सोयाबीनचे भाव हमीभावाच्या तुलनेत वीस रूपयांनी वधारले. 

खरिपातील सोयाबीनची कापणी व मळणी सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी आधीच मळणी केलेला सोयाबीन बाजारात आणल्याने या महिन्याच्या प्रारंभी सोयाबीनचा हंगाम सुरू झाला. यंदा पावसाने सोयाबीनचे पीक उद्‌ध्वस्त केल्याने उत्पादनाची सरासरी घसरली आहे. कृषी विभागाकडून उत्पादनाची सरासरी काढण्यासाठी पीक कापणीचे प्रयोग सुरू असून त्यात परतीच्या पावसाचा व्यत्यय येत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीत शेतमाल विकण्यासाठी आणला त्यांनी एकरी दोन ते तीन पोत्यांची सरासरी असल्याचे म्हटले आहे. सध्या सुरू असलेल्या कापणीवर परतीच्या पावसाचे ढग आहेत. 

दरम्यान, एक ऑक्‍टोबरपासून अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी (ता. एक)3385 पोत्यांची आवक झाली. ती तिसऱ्या दिवशी वाढली व तब्बल 11 हजार 8 पोत्यांची आवक नोंदविली गेली. 3500 ते 3600 रुपये भाव मिळाला. दुसऱ्या सप्ताहात खुललेल्या बाजारात पाच ऑक्‍टोबरपासून आवकमध्ये वाढ नोंदविली गेली. 

दररोज 10 हजारांहून अधिक पोते बाजारात येऊ लागले आहेत. गेल्या दहा दिवसांतील आवक बघता दररोज त्यामध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत असले तरी हमीभावाने मात्र एकाही दिवशी खरेदी झालेली नाही. 10 ऑक्‍टोबरला सुपर प्रतीच्या सोयाबीनला 3800 रुपयांपर्यंत, तर सर्वसाधारण प्रतीच्या सोयाबीनला 3500 रुपये भाव मिळाला. सोमवारी भाव हमीदराच्या तुलनेत वीस रुपयांनी वधारले होते. 

प्रत खालावल्याचे कारण -
केंद्राने सोयाबीनला 3880 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यंदा उत्पादन कमी होण्याचा अंदाज असतानाच हमीभावाची हमी मात्र नाही. खुल्या बाजारात सध्या मिळतेजुळते भाव मिळू लागले आहेत. पावसामुळे सोयाबीनची प्रत खालावल्याचे कारण समोर करण्यात येऊ लागले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT