Farmers happy as water is blocked in Kavalewada dam 
विदर्भ

शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण : वैनगंगेच्या पात्रात पाणीच पाणी; धरणावर पर्यटकांची हजेरी

दिलीप फुलबांधे

सिहोरा (जि. भंडारा) : पिपरी चुन्नी ते बपेरा गावापर्यंत १८ किमी अंतरापर्यंत वैनगंगा नदीचे पात्र विस्तीर्ण जलाशयाप्रमाणे तुडूंब भरले आहे. नदीपात्रात पाणीच पाणी दिसत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

कवलेवाडा धरणात पाणी अडविण्यात आल्याने विहंगम दृश्‍य निर्माण झाले आहे. धरणावर पर्यटकांची हजेरी सुरू झाली आहे. नदीपात्रात नौका विहार करण्याची मंजुरी देण्याची मागणी होत आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पादन्नात वाढ होणार असल्याचे नागरिकांत चर्चा आहे. वैनगंगा नदीवर कवलेवाडा गावच्या शेजारी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरण मार्गामुळे तिरोडा व सिहोरा परिसरातील गावांचे अंतर कमी झाले आहे.

धरणात पाणी अडविण्यात आल्याने धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. या धरणाच्या बांधकामांमुळे तिरोडा-चांदपूर बस फेऱ्या सुरू करण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यासोबत थेट संपर्क शक्‍य आला आहे. परंतु, नदी पात्रात अडविण्यात आलेल्या पाण्याचा उपयोग सिहोरा परिसरातील शेतकरी व नागरिकांना होत नाही.

या नदीकाठावर देवरीदेव, सुकळी (नकुल), बपेरा ही गावे आहेत. या गावांच्या शिवारात व नदीकाठावर अनेक देवस्थाने असून पर्यटनाला चालना मिळू शकते. परंतु, या दिशेने प्रयत्न करण्यात आले नाहीत. नदीपात्रातील पाण्याचा अदानी वीज प्रकल्प, धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून उपसा करण्यात येत आहे.

गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी धान उत्पादनात अग्रेसर होत आहेत. धरणात पाणी अडविण्यात आल्याने सिहोरा परिसरातील शेतकरी व नागरिकांना याचा फायदा झाला आहे. परंतु, आर्थिक क्षेत्रात गावाचा सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत नाही. नदीपात्रात नौकाविहार करण्याची संधी आहे. यामुळे ग्रामपंचायतच्या आर्थिक उत्पादनात वाढ होणार आहे. या परिसरात लहान-लहान पर्यटनस्थळांच्या विकासकामाला गती देण्यात येत नाही.

या परिसरात व्यवसाय व उद्योगधंदे नाहीत शेती व्यवसायावर नागरिकांचे उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे पर्यटन स्थळे विकसित करण्याची गरज आहे. नदीच्या पात्रात विस्तारित पाणी आहे. अर्जुनी गावाच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचले आहे. या गावालाही फायदा होऊ शकतो. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या योजनेला पुनर्जिवित करण्याची आवश्‍यकता आहे.

स्थिरीकरण योजना थंडबस्त्यात

नदीपात्रात बारमाही पाण्याचा थांबा असल्याने माजी आमदार चरण वाघमारे यांनी चांदपूर जलाशयात पाणी उपसा करण्यासाठी बपेरा-चांदपूर स्थिरीकरण योजनेचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, त्यानंतर ही योजना थंडबस्त्यात गेली. या योजनेमुळे शेतकऱ्यांत आशा पल्लवित झाल्या होत्या.

दरम्यान नदीच्या काठावर असणाऱ्या नळयोजनांना पाणी मिळत असल्याने सिहोरा परिसरातील नागरिकांना फायदा होत आहे. याशिवाय नदीकाठावरील गावांचे शिवारात नाले तुडुंब भरल्याने विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे शिवारात उन्हाळी धानपीक घेतले जात आहे. नाल्यातून मोटारपंपाने पाण्याचा उपसा केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित आर्याने १७ मुलांना जमवलं कसं? गोळी झाडली की नाही? एन्काउंटरबाबत मोठे अपडेट समोर

Belagav Black Day : काळा दिनानिमित्त बेळगावात आज निषेध फेरी; कर्नाटक प्रशासनाकडून महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश बंदीच्या नोटिसा

Latest Marathi News Live Update : मराठी भाषकांवर अन्याय, बेळगाव सीमाभागात आज काळा दिन पाळला जाणार

MNS and MVA Morcha in Mumbai : निवडणूक आयोगाविरोधात आज 'मनसे'सह ‘मविआ’चा मुंबईत निघणार ‘सत्याचा मोर्चा’

‘HSRP’ नंबरप्लेट नंबर नसल्यास होणार ‘इतका’ दंड! पहिल्यांदा १००० रुपये, त्यानंतर प्रत्येकवेळी १५०० रुपये दंड; सोलापूर जिल्ह्यात ७,२६,९१८ वाहनांना जुनीच नंबरप्लेट

SCROLL FOR NEXT