file photo 
विदर्भ

कोंब फुटलेल्या सोयाबीनसह अखेर शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात, नुकसानाच्या पंचनाम्याची मागणी

सूरज पाटील

यवतमाळ : सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. न्याय मदतीच्या मागणीसाठी कोंब फुटलेले सोयाबीन घेऊन शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. नैसर्गिक आपत्ती विभागाच्या पथकामार्फत पंचनामा करण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

खरीप हंगामात जिल्ह्यात तीन लाख २५ हजार हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतातील उभ्या सोयाबीन शेंगाला कोंब फुटत आहेत.

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा

महागाव, उमरखेड, पुसद या तालुक्‍यांसह इतरही ठिकाणी नुकसानाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे याची पाहणी कृषी विभागामार्फत करण्यात आली. मात्र, केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाच्या पथकाकडून वस्तुनिष्ठ पाहणी करण्यात यावी, पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे आवश्‍यक आहे. पीकविमा जिल्ह्यात सरसकट लागू करण्यात यावा, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी शेतकरी संघटनेचे मनीष जाधव, शैलेश राठोड, अश्‍विन लोणकर, सुनील राठोड, प्रेम राठोड, दीपक पोरजवार, रवी राठोड, युसूफखान अलीयर खान पठाण, निशिकांत राऊत, प्रमोद यादव, अशोक चव्हाण, भीमराव राठोउ, प्रशांत पवार, विनोद राठोड आदी उपस्थित होते.

अन्यथा आठ दिवसांत रस्त्यावर

कोविड-१९मुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. सोयाबीनला कोंब फुटत आहेत. कपाशीचे बोंड गळून पडत आहेत. तूर पिवळी पडत आहे. चहुबाजूंनी शेतकरी संकटात सापडले आहेत. निवेदन दिल्यापासून आठ दिवसांत पंचनामा करण्यात यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.



(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT