farmers not arrived yet for soybean selling in nafed wardha 
विदर्भ

नाफेडला मुहूर्तालाही सोयाबीन मिळेना, शेतकऱ्यांची बाजाराकडे धाव

रूपेश खैरी

वर्धा : सोयाबीनला हमी भाव मिळावा यासाठी शासनाने निर्णय घेत लवकरच नाफेडमार्फत खरेदी करण्याच्या सूचना दिल्या. नेहमी खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट पाहावी लागत होती. मात्र, यंदा १५ ऑक्टोबरपासूनच खरेदी सुरू झाली. पण, अद्याप एकही शेतकरी सोयाबीन घेऊन दाखल झाला नाही. त्यामुळे नाफे़ला मुहुर्तालाही सोयाबीन मिळाले नाही.

जिल्ह्यात नाफेडची एकूण दहा केंद्रे आहेत. यामध्ये सात केंद्र जिल्हा मार्केटींग कार्यालय आणि तीन केंद्र विदर्भ मार्केटींग फेडरेशन सांभाळणार आहे. यात आर्वी, सिंदी आणि सेलूचा समावेश आहे, तर हिंगणघाट, समुद्रपूर, वर्धा, देवळी, पुलगाव, आष्टी आणि कारंजाचे काम मार्केटिंग कार्यालयाकडे देण्यात आले आहे. मार्केटिंग कार्यालयात झालेल्या अतापर्यंत 857 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. पण एकानेही या केंद्रावर सोयाबीन दिले नाही. 

यंदा आलेल्या किडीमुळे आणि सततच्या पावसामुळे सोयाबीनची उतारी कमी आली. बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करण्याऐवजी त्यावर ट्रॅक्‍टर चालविले, तर ज्यांनी काढले त्यांना एकरी दोन ते तीन पोते सरासरी उत्पादन झाले. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतातच सडले. ते सडके सोयाबीन घेऊन शेतकरी बाजारात आले असता त्यांना व्यापाऱ्यांकडून हजार ते दीड हजार रुपये दर दिला जात आहे. 

शेतकऱ्यांना बाजारात अधिक दर - 
शासनाकडून सोयाबीनला मिळणाऱ्या दराच्या तुलनेत बाजारात अधिक भाव मिळतोय. यामुळे शासकीय खरेदीला पाठ दाखवून शेतकऱ्यांनी बाजारात धाव घेतली आहे. येथे सोयाबीनला चार ते साडेचार हजार रुपये दर मिळत आहे. शिवाय खराब सोयाबीन घेण्यास नाफेड तयार नाही. यामुळे शेतकऱ्यांचा कल बाजार समितीकडे आहे. 

माझ्याकडे आठ एकर शेती आहे. या आठ एकरात 12 पोते सोयाबीन झाले. सरासरी विचार केल्यास एकरी दीड पोते होतात. ते काढण्याचाही खर्च निघत नाही. यात बाजारात असलेल्या अधिक दरामुळे तिथेच सोयाबीन विकण्याचा निर्णय घेतला. 
-गौरव मेघे, शेतकरी, सेलसुरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरलं! भररस्त्यात गोळीबार, वार करत खून; अज्ञात मारेकऱ्यांचा दिवसाढवळ्या धुमाकूळ..

Latest Marathi News Live Update : एकाच घरात दोन पक्ष; चंद्रपुरात पती-पत्नी वेगवेगळ्या पक्षांतून निवडणूक रिंगणात

Arvind Sawant : "त्यांना डॉबरमॅन म्हणायचे की मांजर?" अरविंद सावंतांचा सुधाकर बडगुजर यांना बोचरा सवाल

Marathwada Crime : मोबाइल घेण्यावरून वाद! आधी सिगारेटचे चटके दिले आणि नंतर चिरला गळा; चौघांवर गुन्हा, संशयिताला अटक

T20 World Cup 2026 : भारतात खेळा नाही तर...! ICC चा बांगलादेशला थेट इशारा, 'ती' मागणीही फेटाळली

SCROLL FOR NEXT