Fear in people of Moharana bhandara district due to tiger  
विदर्भ

मोहरणा शिवारात 'त्याची' दहशत; नागरिकांची उडाली झोप; जीव मुठीत घेऊन जातायत शेतात 

सकाळ वृत्तसेवा

लाखांदूर (जि. भंडारा) : शिकारीच्या शोधात भटकलेल्या एका 4 ते 5 वर्षीय पट्टेदार वाघाने मोहरणा शिवारातील नाल्याजवळ झुडपात ठिय्या मांडल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस झाले आहे. त्यानंतर अनुचित घटना टाळण्यासाठी परिसरात वन कर्मचारी व पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवून वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. यामुळे गावकरी आणि शेतात कामावर जाणाऱ्या मजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

तालुक्‍यातील मोहरणा नजीकच्या प्रशांत राऊत यांच्या शेताकडे मंगळवारी सकाळी काही नागरिक फिरायला गेले होते. त्यांना नाल्याजवळील झुडपात पट्‌टेदार वाघ बसलेला आढळून आला. याची माहिती मिळाल्यावर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने लाखांदूर येथील वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश गावित, वनरक्षक एस. जी. खंडागळे, जी. डी. हाते, प्रफुल्ल राऊत आदींनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

दरम्यान, वाघाला पाहण्यासाठी गावकऱ्यांसह शेजारच्या गावातील नागरिकांची चांगलीच गर्दी झाली. मोहरणा येथे गर्दी वाढत असल्याने अनुचित घटना टाळण्यासाठी लाखांदूर पोलिसांना पाचारण करण्यात आले. येथे आलेला पट्‌टेदार वाघ अंदाजे चार ते पाच वर्षे वयोगटातील असून शिकारीच्या शोधात वैनगंगा नदीपलीकडून आला असावा असा अंदाज वर्तविल्या जात आहे.मोहरणा शिवारात वाघ दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या भागात रब्बी पीक काढणी व उन्हाळी धान रोवणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी व मजूर दिवसभर शेतात असतात. मात्र, आता वाघाच्या हजेरीने शेतकरी वर्गात दहशत निर्माण झाली आहे. या परिसरात 10 वर्षांपूर्वी एका वाघाने शिरकाव करून किरमटी येथे बैलाची शिकार केली होती. आता दहा वर्षानंतर पुन्हा पट्‌टेदार वाघ आढळल्याने त्याबाबत चर्चांना ऊत आला आहे.

मचाण बांधून वन कर्मचाऱ्यांची गस्त

मोहरणा शिवारात दिवसभर ठिय्या मांडून बसलेल्या वाघावर लक्ष ठेवण्यासाठी लाखांदूर वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मचाण बांधून रात्रभर गस्त सुरू केली आहे. हा वाघ मंगळवारी दिवसभर शेतालगतच्या नाल्यातील झुडपात दडी मारून बसला होता.

तो रात्रीच्या सुमारास शिकारीच्या बाहेर आल्यास कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सतर्कतेची उपाय योजना म्हणून वन कर्मचाऱ्यांनी शेतात मचाण बांधून रात्रभर गस्त सुरू केली. शेतात उन्हाळी धान रोवणीची कामे सुरू असल्याने रात्रीच्या सुमारास कृषी पंप सुरू करण्यासाठी शेतकरी शेतात जातात. त्यांना वाघापासून संभाव्य धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT