Fear in rural people about the viral fever asymptomatic corona patients  
विदर्भ

व्हायरल म्हणजेच ऍसिम्प्टोमॅटिक तर नाही ना? ग्रामीण भागातील नागरिकांसह वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये प्रचंड भीती

सुधीर भारती

अमरावती : कोरोना ऍसिम्प्टोमॅटिक (लक्षणे नसलेली, परंतु पॉझिटिव्ह असलेली व्यक्ती) तसेच सध्याच्या व्हायरल फिव्हरची लक्षणे अगदीच मिळतीजुळती दिसून येत असल्याने रुग्णांसह वैद्यकीय तज्ज्ञसुद्धा चक्रावले आहेत. याच भीतीपोटी ग्रामीण भागात सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांवर उपचारापूर्वी त्यांना कोविड टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. सध्याचा व्हायरल हा ऍसिम्प्टोमॅटिक तर नाही ना? अशी चर्चा आता सुरू झालेली आहे.

ग्रामीण भागातील कोविड रुग्णांची लक्षणीय वाढ झाली आहे. कोविड-19 च्या सर्वसामान्य लक्षणांमध्ये सर्दी, ताप, खोकला यासारख्या त्रासाचा समावेश आहे. मात्र सर्वच प्रकारचा सर्दी, खोकला हा कोविड नसतो, असे सुरुवातीला सांगण्यात येत होते. दोन ते तीन दिवसांच्या औषधोपचारानंतरही लक्षणे अधिक दिवस राहिली तर ते मात्र धोकादायक ठरू शकते. मागील काही दिवसांत वातावरणात अचानक बदल घडून आला असून एकाएकी उकाड्यात वाढ झाली. 

उन्हाळ्यासारखाच उकाडा नागरिक सोसत आहेत. त्यातच अंगातून घाम जाणे, सर्दी, खोकला, ताप अशी व्हायरलची लक्षणे दिसू लागली. मात्र आता हीच लक्षणे ऍसिम्प्टोमॅटिकची तर नाही ना? अशी शंका येऊ लागली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात सध्या व्हायरल फिव्हरचा कहर वाढला असून लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच त्याने कवेत घेतले आहे. अनेकजण व्हायरलवर मात करून त्यातून बरे होत आहेत, तर अनेकांना सात ते आठ दिवस त्यातून बरे होण्यासाठी लागत आहेत. अशा स्थितीत रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आरोग्य केंद्रांवरील ताण वाढला

शहराप्रमाणेच ग्रामीण भागात सर्दी, ताप व खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्यकेंद्रांवर त्याचा अतिरिक्त ताण वाढलेला आहे. त्यातच कोविडच्या रुग्णांमध्येसुद्धा सातत्याने होणारी वाढ चिंता वाढविणारी आहे.

ग्रामीण भागात व्हायरलच्या रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी खबरदारी म्हणून कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कारण व्हायरल आणि ऍसिम्प्टोमॅटिक यामध्ये बरेचसे साम्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डॉक्‍टरांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही चाचणी गरजेची आहे. शिवाय आता ग्रामपंचायत स्तरावर होम आयसोलेशनला परवानगी देण्यात आली आहे. कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवस रुग्णांची परिस्थिती पाहून नंतर होम आयसोलेशनचा निर्णय घेतला जातो.
-डॉ. मनीषा सूर्यवंशी, 
जिल्हा साथरोग अधिकारी.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : हिंजवडीमध्ये १८ तासांपासून बत्ती गूल

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT