kurnakhed bank.jpg 
विदर्भ

युनियन बँकेसमोर ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा

योगेश विजयकार

कुरणखेड (जि. अकोला) : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सुरक्षितता जपणेच महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेता शासनाकडून लॉकडाउन करण्यात आले. मास्क, सामाजिक अंतर राखण्याच्याही सक्त सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अलिकडेच दिल्या आहेत. मात्र, येथील युनियन बँकेसमोर त्यांच्या या आदेशाला खो-दिल्याचे पहायला मिळत आहे. दैनंदिन व्यवहारासाठी बँकेसमोर नागरिकांची चांगलीच झुंबड उडताना दिसून येत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडला आहे. यासंदर्भात बँकेशी संपर्क केला तेव्हा, ‘गर्दीसाठी आम्ही जबाबदार नसल्याचे’ अजब उत्तर दिल्या जात आहे.

वाढू शकतो कोरोनाचा संसर्ग
शासनाने 21 दिवसांची संचारबंदी केल्यानंतर पुन्हा त्याचा कालावधी हा 30 एप्रिलपर्यंत वाढवून दिला आहे. दरम्यानच्या काळात सामान्यांची कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्‍यक सेवा हा सुरू ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत. अत्यावश्‍यक सेवेदेतानाही कुठेही गर्दी होऊ नये याचे नियोजनही शासनाकडून करण्यात आले. त्यामुळे या सेवांचा वेळही नियोजित केला. त्यामध्ये सकाळी आठ ते 12 पर्यंत बँक सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. यावेळी येथे सामाजिक अंतर राखून कामकाज करण्याच्या सूचना निर्गमित केल्या गेल्या आहेत. मात्र, येथील शिवाजी चौक (माळीपूरा) येथील युनियन बँकेत लॉकडाउनचे पालन होत नसल्याचे भीषण वास्तव पुढे आले आहे. नागिरकांकडून दैनंदिन व्यवहारासाठी बँकेसमोर गर्दी केली जात आहे. कुरणखेडच्या युनियन बँकेच्या शाखेंच्या व्याप परिसरातील सुमारे 15 पेक्षा अधीक गावांमध्ये पसरलेला आहे. त्यामुळे नागरिक येथून येत आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन गर्दीवर नियंत्रण मिळविण्याजी गरज आहे. अन्यथा कोरोनाच्या काळात येथे धोका उद्‍भविण्याचे संकेत नाकारता येत नाही.

जनधनचे पैसे काढण्यासाठी धूम
प्रधानमंत्री जनधेने खात्यातील पैसे काढण्यासाठी बँकेसमोर गर्दी केल्या जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या व वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानूसार वृद्धांना कोरोनाचा धोका अधीक आहे. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. पण येथे याला फाटा दिल्या जात आहे. बँकेसमोर वृद्धांचीही गर्दी पहायला मिळत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने येथे ग्रीन नेट लावण्याचीही मागणी होत आहे.

नागरिक सामाजिक अंतर पाळत नाही आहेत
युनियन बँक शाखेतर्फे ग्राहकांसाठी सॅनिटयझरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतरच त्यांना आत प्रवेश दिल्या जातो. सुरक्षा गार्ड आहेत. अपुऱ्या मणुष्यबळातही ग्राहकांना सुविधा दिल्या जात आहेत. नागरिक सामाजिक अंतर पाळत नाही आहेत. बाहेर झालेल्या गर्दीला आम्ही जबाबदार नाही आहे.
-शिवाजीराव घुगे, शाखा प्रबंधक, युनियन बँक, कुरणखेड

ग्रामीण क्षेत्रातील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. युनियन बँक कुरणखेड येथे बँकेच्या कामकाजादरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात येईल.
-संतोष आघाव, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस स्टेशन बोरगाव मंजू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT