FIR filed against bjp candidate nitin dhande due to violence of code of conduct in amravati 
विदर्भ

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाचे भाजपचे उमेदवार डॉ. नितीन रामदास धांडे यांच्याविरुद्ध रविवारी (ता. 22) रात्री आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यांनी हॉटेल मैफिल इनच्या रुबी हॉलमध्ये एक सभा घेतली होती. या सभेला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. 

आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही सभेसाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी गरजेची असते. मात्र, त्यांनी सभेसाठी अधिकृत परवानगी न घेताच सभा घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सभेला संबोधित केले. मात्र, डॉ. नितीन धांडेच सभेचे मुख्य आयोजक असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे आयोजकांनी उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. उपविभागीय अधिकारी रणजित बबनराव भोसले यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली. 

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी अधिकृत परवानगी न घेता सभा घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर देखील आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Statement : ''मुंबईत अ‍ॅनाकोंडा येऊन गेला अन् भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

Sonika Yadav Video: सात महिन्यांची गर्भवती जिद्दीने उभी राहिली! वेटलिफ्टिंग स्पर्धेत १४५ किलो भार उचलून जिंकले पदक

Swargate News : एसटीला ‘लाडकी बहिणच’ नकोशी! बससेवेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर भेदभाव

SIR प्रक्रियेच्या १२ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव का नाही? निवडणूक आयोगाने थेट उत्तरच दिले!

Harman Investment Pune : पुण्यात होणार तब्बल ३४५ कोटींची गुंतवणूक; ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये मिळणार नोकऱ्या

SCROLL FOR NEXT