FIR filed against shivsena worker santosh dhawale in insurance company manager beaten case yavatmal 
विदर्भ

पीकविमा कंपनीच्या मॅनेजरला मारहाण करणे सेनेला भोवले, संपर्क प्रमुख संतोष ढवळेंविरोधात गुन्हा दाखल

राजकुमार भितकर

यवतमाळ : पीकविमा कंपनी इफको टोकियोच्या जनरल मॅनेजरला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल नोंदविण्यात आले आहेत. पोलिस उपनिरीक्षक दर्शन दीकोंडवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हे गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

शेतकर्‍यांना पीकविम्याचा लाभ देण्यात आला नसल्याने खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. 28) पीकविमा कंपनीच्या कार्यालयासमोर 'जवाब दो आंदोलन' करण्यात आले. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई का देण्यात आली नाही? याचा जाब विचारण्यासाठी खासदार गवळी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ इफको टोकियो कंपनीच्या कार्यालयात गेले होते. चर्चा सुरू असतानाच यवतमाळ विधानसभेचे संपर्कप्रमुख संतोष ढवळे यांनी पीकविमा कंपनीचे अधिकारी सचिन सुरवसे यांच्या अंगावर सोयाबीनचे दाणे टाकले, तसेच त्यांना मारहाण केल्याची तक्रार पोलिस उपनिरीक्षक दर्शन दीकोंडवार यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून संतोष ढवळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT