Fire at cloth shop in gondia  
विदर्भ

ऐन दिवाळीच्या तोंडावर गोंदियात कापड दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया :  येथील गजबजलेल्या खोजा मशीद परिसरातील एनडी टेक्सटाईल्स या कापड दुकानाला आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना शनिवारी  घडली. 

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ  गजबजली आहे. लग्नसोहळेदेखील पार पडणार आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गोंदियातील बाजारात गर्दी करीत आहेत. दररोज ही गर्दी असते. त्यातही कपड्यांच्या दुकानांत सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. 

दरम्यान, आज शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास  गोरेलाल चौक ते स्टेडिअमदरम्यान असलेल्या खोजा मशीदजवळ असलेल्या एनडी टेक्सटाईल्स या कपड्यांच्या दुकानाला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले. 

नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, आग लागण्याचे नेमके कारण  कळू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
  
संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT