Fireworks center fires in Bhandara 
विदर्भ

भंडारा : फटाक्यांच्या आवाजाने परिसर दणाणला; फटाका सेंटरच्या आगीत दोन दुकान खाक

सकाळ डिजिटल टीम

भंडारा : पंधरा ते वीस दिवसांवर दिवाली येऊन ठेपली आहे. यामुळे जिथे तिथे मोठ्या प्रमाणात फटाक्याचे दुकान थाटले जात आहे. यामुळे आगीचा धोकाही वाढला आहे. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील सिंधी लाईन येथे घडली. येथील दोन फटाका सेंटरला मध्यरात्री भीषण आग लागली. यात दोन्ही दुकाने जळून खाक झाली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

शहरातील सिंधी लाईन परिसरातील फटाका सेंटरला मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. फटाका सेंटर असल्यामुळे अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या लोटात फटका सेंटरच्या बाजूला असलेल्या फुलाच्या दुकालाही आग लागली. यात दुकान संपूर्ण जळून खाक झाले आहे.

आगीची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर लाखनी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझवण्यात जवानांना यश आले. यात दोन्ही दुकानांचे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

आवाजाने परिसर दणाणला

ही आग मध्यरात्रीच्या सुमारास लागली. यावेळी दुकानात आणि परिसरात कुणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. फटाका दुकानाला आग लागल्यामुळे दुकानातील फटाक्यांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला होता. त्यामुळे दुकानाच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी घराच्या बाहेर पडावे लागले होते. ही आग शार्टसर्किटने लागल्याच्या अंदाज वर्तवण्यात येत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra : अवीवा बेग होणार प्रियांका गांधींची सून, मुलगा रेहान करतो काय?

मलायका अरोराच्या रेस्टॉरंटमध्ये खिचडी खायला किती पैसे मोजावे लागतील? पाण्याच्या बाटलीची किंमत वाचून थक्क व्हाल

Ola, Uber चा खेळ संपणार? १ जानेवारीला लाँच होतय Bharat Taxi App ; जाणून घ्या तुम्हाला कसा होणार फायदा

Crime News : भाजप नेत्याच्या 21 वर्षीय लेकाचे तरुणीशी शारीरिक संबंध, गर्भवती होताच म्हणतो, 'ते बाळ माझं नाही...'

Mahapalika Election: पुतीन अन् ट्रम्पही महाराष्ट्रात प्रचाराला येतील, संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका

SCROLL FOR NEXT