The first Collector of Melghat happened from the date of the calendar
The first Collector of Melghat happened from the date of the calendar 
विदर्भ

आज कलेक्टर डिक्लेअर सुट्टी; कॅलेंडरच्या तारखेतून घडला मेळघाटातील पहिला जिल्हाधिकारी

श्रीनाथ वानखडे

मांजरखेड (जि. अमरावती) : कॅलेंडरमधील तारीख लाल रंगात असली की शाळेला सुट्टी असते. मग आजच्या तारखेत लाल रंग नाही. तरी शाळेला सुट्टी का आहे मॅडम? नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सातवीमधील विद्यार्थ्याच्या प्रश्नावर मॅडम म्हणाल्या ‘अरे आज कलेक्टर डिक्लेअर सुट्टी आहे ना...’ आणि तेथून त्याने ठरवले आपण पण जिल्हाधिकारी व्हायचे. नारवाटी गावातील नवोदयाचा विद्यार्थी असलेल्या संतोष सुखदेवे यांनी केंद्रशासित प्रदेश लडाखमधील कारगील जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, उपायुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.

मेळघाटमधील धारणी तालुक्यातील नारवाटी जेमतेम साडेचारशे वस्तीचे गावं. गावात इयत्ता चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळा. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या मुलाच्या आईचे स्वप्न होते मुलगा सरकारी नोकरीत लागावा. प्राथमिक शिक्षकांच्या मार्गदर्शनातून संतोषचा नवोदयाला नंबर लागला.

तेथून आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यानंतर आयुष्यात कधीही मागे वळून बघितलेच नाही. स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर बार्टी दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून २०१७ च्या बॅचमध्ये आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली.

वडील अल्पभूधारक शेतकरी. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. पुणे येथे पदवीचे शिक्षण घेताना पैसे कमी पडत होते. म्हणून विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेअंतर्गत परिश्रम करून शिक्षण घेतले. कधी कधी तर चक्क दोन तीन पारले बिस्कीट पुड्यावर दिवस काढून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. दिवसातील तब्बल १३ ते १४ तास अभ्यास करून प्रथम प्रयत्नात आयएएस होण्याचा मान मिळविला.

शिक्षकामुळे घडले भवितव्य

प्राथमिक शिक्षक म्हणून लाभलेले पंकज देशमुख, प्रकाश कानडे यांच्यामुळे गणित व इतर विषयाचा पाया मजबूत झाला. पाचवीचे शिक्षक गौतम वानखडे यांनी शालेय वेळे व्यतिरिक्त नवोदय परीक्षेचे मार्गदर्शन केल्यामुळे मेळघाट बाहेर शिक्षण घेऊ शकलो. नवोदय विद्यालयातील शिक्षणामुळेच स्पर्धा परीक्षेकडे वळून समाजातील जास्तीत जास्त लोकांसाठी काम करता यावे म्हणून आयएएस होण्याचा निर्धार केला. मागील वर्षात मेळघाटातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाल्यामुळे एकाच वेळी १५ विद्यार्थी एमबीबीएसला प्रवेश घेऊ शकले. आता व भविष्यात मेळघाटात येणारे अधिकारी हे माझे सहकारी असल्याने त्यांच्या माध्यमातून मेळघाटातील मूलभूत सुविधा, शिक्षण व ग्रंथालय सारख्या सुविधेवर माझा भर राहणार असल्याचे संतोष सुखदेवे यांनी सांगितले.

यांनीही उंचावला जिल्ह्याचा मान

संतोष सुखदेवे यांनी मेळघाटातून प्रथम आयएएस होण्याचा मान पटकाविला आहे. यापूर्वी अमरावती शहरातील आशीष ठाकरे (ओरिसा कॅडर), स्वप्निल वानखेडे (मध्य प्रदेश) तर ग्रामीण भागातील हिवरखेड (मोर्शी) येथील भाग्यश्री बाणाईत (नागलंड), दर्यापूर येथील शुभम ठाकरे (तामिळनाडू) येथे कार्यरत आहेत. आता अलीकडच्या काळात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.

कोरकू बोलीभाषा ते इंग्रजी प्रवास
नारवाटीला असताना केवळ कोरकू बोलीभाषा यायची. नवोदयाला गेल्यावर मराठी यायला लागली. पुणे येथे बी ई करत असताना इंग्रजी येत नव्हती. त्यामुळे तब्बल एक वर्ष एकाच मित्रासोबत बोलायचो. आता मात्र परिश्रम करून इंग्रजीवर प्रभुत्व मिळविले. परिश्रमाला सुयोग्य दिशा दिल्याने जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचू शकलो.
- संतोष सुखदेवे
नवनियुक्त जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT