five arrested in illegal chicken market case if wani of yavatmal
five arrested in illegal chicken market case if wani of yavatmal 
विदर्भ

यवतमाळमध्ये कोंबड बाजारावर छापा; पाच जणांना अटक, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

सूरज पाटील

यवतमाळ : वणी तालुक्‍यातील कायर बीटअंतर्गत सुरू असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पाच जणांना ताब्यात घेत साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिरपूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईने जुगारींमध्ये खळबळ उडाली आहे.

जीवन काकडे (वय 28, पिंपरी), संदीप बांदुरकर (वय 28, रा. पिंपरी), सुभाष लोंढे (वय 45), भास्कर वाचोसे (वय 45, रा. येन्नापूर, जि. चंद्रपूर) व मारोती खंडाळकर (वय 60) , असे अटकेतील संशयितांची नावे आहेत. पिंपरी येथील जंगलात कोंबड बाजार सुरू असल्याची टीप शिरपूर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी छापा टाकला. पोलिस आल्याची चाहूल लागताच 10 ते 15 जण पळून गेलेत. पाठलाग करून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून नऊ दुचाकी, मोबाईल व रोकड, असा एकूण पाच लाख 44 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

शेतकऱ्यांचा वेश केला धारण -
पिंपरी येथील जंगलात मागील काही महिन्यांपासून कोंबड बाजार सुरू होता. मात्र, कधी छापा टाकून कारवाई करण्यात आल्याचे समजले नाही. जुगारींना संशय येऊ नये, म्हणून शेतकऱ्यांचा वेश परिधान केला आणि लपत-छपत जाऊन जुगारींना ताब्यात घेतले. तरीही पोलिसांची चाहूल लागल्याने दहा ते 15 जण पळून गेलेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT