five women elected in standing committee of chandrapur corporation
five women elected in standing committee of chandrapur corporation 
विदर्भ

स्थायी समितीत दिग्गजांना फटका, दगाफटका टाळण्यासाठी भाजपची खेळी

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : मनपाच्या स्थायी समिती सभापतिपदाकडे डोळे लावून बसलेल्या भाजपच्या दिग्गज नगरसेवकांच्या पदरी निराशाच आली. मंगळवारी (ता.19) झालेल्या मनपाच्या आमसभेतून स्थायी समितीकडे नावे पाठविण्यात आली. भाजपकडून सात सदस्यांमध्ये पाच महिलांना संधी देण्यात आली. सभापतिपदासाठी पक्षांतर्गत चुरस बघता सभापती ठरविताना दगाफटका होऊ नये यासाठी ही काळजी घेतल्याचे बोलले जात आहे. यामुळे भाजपचे काही नगरसेवक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. 

सलग चार वर्ष स्थायी समितीचे सभापती पद राहुल पावडे यांच्याकडे होते. मनपाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पावडे यांच्याकडे उपमहापौर पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, सभापतिपद त्यांनी सोडले नाही. त्यांना या पदावरून घालविण्यासाठी अनेक नगरसेवकांनी देव पाण्यात ठेवले होते. परंतु, पक्षनेतृत्वाने त्यांना धक्का लावला नाही.  मुदत संपल्यानंतरही ते या पदावर कायम होते. स्थायी समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक घ्या, असे पत्रसुद्धा शासनाने पाठविले होते. त्यानंतरही त्यांची खुर्ची कायम होती. ज्यांनी पावडेंना धक्का लावण्याचा प्रयत्न केला. त्यांना आता स्थायी समितीत स्थान मिळाले नाही, हे विशेष.

दरम्यान, चवथ्या वर्षांचा कार्यकाळ संपायला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच 16 सदस्यीय या समितीतून आठ सदस्यांना ईश्‍वर चिठ्ठीने निवृत्त करण्यात आले. यात सभापती राहुल पावडे यांचाही समावेश होता. पावडे बाहेर पडल्यानंतर इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या. अनेकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन आपली इच्छा व्यक्त केली. परंतु, नावे पाठविताना यापैकी अपवाद वगळता एकाचाही समावेश करण्यात आला नाही. चार वर्षे या पदापासून दूर राहिलेले असंतुष्ट आत्मे सभापती पदाच्या निवडणुकीत दगाफटका करतील, अशी भीती भाजपच्या गोटात होती. त्यामुळे नावे पाठविताना उपद्रव मूल्य कमी असलेल्या नगरसेवकांनाच संधी देण्यात आली. यात मनपाचे भाजपचे सभागृह नेते वसंता देशमुख यांच्यासह नगरसेवक देवानंद वाढई, ज्योती गेडाम, वंदना तिखे, सविता कांबळे, शीतल आत्राम, वनिता डुकरे यांचा समावेश आहे. काँग्रेसने नगरसेवक अली अमजद मन्सूर यांना संधी दिली. स्थायी समितीचे सदस्य दीपक  जयस्वाल यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्याऐवजी शहर विकास आघाडीच्या मंगला आखरे यांच्या नावाची शिफारस केली. 

तत्पूर्वी, भाजपने देशमुख यांच्याकडून सभागृह नेतेपदाचा राजीनामा घेतला. त्यांच्याऐवजी संदीप आवारी यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. आवारी सभापती पदासाठी इच्छुक होते. परंतु, त्यांची सभागृह नेतेपदावर बोळवण करण्यात आली. सभापतिपदी देशमुख यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. मात्र, सभापती पदाचे नाव ठरले नाही. वेळप्रसंगी निवडणूक होईल, असे भाजपच्या एका नगरसेवकाने सांगितले.

देशमुखांचा सभात्याग -
मागील काही दिवसांपासून कचरा संकलन निविदेतील कथित घोटाळ्यावरून मनपातील सत्ताधाऱ्यांना लक्ष केले जात आहे. आजच्या आमसभेतही याचे पडसाद उमटले. नगरसेवक पप्पू देशमुख यांनी नियम कचरा संकलन आणि वाहतुकीचा ठराव घेण्यात आल्याची तक्रार महापौरांकडे केली. मात्र, महापौर आणि स्थायी समिती सभापतीने त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आला. त्यामुळे देशमुख यांनी सभात्याग केला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT