forest minister sanjay rathod about wildlife in wardha  
विदर्भ

व्याघ्र भ्रमंतीचे मार्ग वाचविण्याची गरज - वनमंत्री राठोड

रूपेश खैरी

वर्धा : वाघाचा अधिवास असणारे जंगल सर्वात समृद्ध आणि परिपूर्ण जंगल समजले जाते. वाघांसाठी गाभा क्षेत्रासोबतच त्यांचे भ्रमण मार्ग टिकवून ठेवणेसुद्धा तेवढेच आवश्‍यक आहे. परंतु, विकासात्मक कामे करताना जंगलातील वाघाचे भ्रमंती मार्ग बाधित होतात. वाघांचे भ्रमण मार्ग टिकवून ठेवण्यास बाधा आणणारे विभाग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवरसुध्दा यापुढे कारवाई करू, असा इशारा वनमंत्री संजय राठोड यांनी दिला आहे. 

बोर अभयारण्यातील पुनर्वसित नवरगावच्या पाहणीनंतर बोर व्याघ्र प्रकल्पात भ्रमंती करून वनविभागाच्या जुन्या नवरगाव येथील विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. वन विभाग, वन्यजीव आणि सामाजिक वनीकरण, अशा तीनही विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी कामाचे नियोजन, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि येणाऱ्या अडचणी संदर्भात सखोल चर्चा केली. मानव वन्यजीव संघर्षाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बोर व्याघ्र प्रकल्पातील नवरगावचे आदर्श पुनर्वसन झाले आहे. मात्र, या क्षेत्राला लागून असलेल्या 22 गावांची पुनर्वसनाची मागणी आहे. पुनर्वसनाने हा प्रश्न सुटणार नाही. मनुष्य आणि वन्यजीव हानी टाळण्यासाठी गावांना आणि शेताला सौर कुंपण देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा विषय मंत्री मंडळासमोर ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

बोर प्रकल्प येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट आणि वापरात नसलेल्या इमारती एफडीसीएमकडे हस्तांतरित केल्यास त्याची योग्य काळजी घेऊन त्यांचा चांगला वापर करता येईल. यासंदर्भात त्यांनी स्वतः  पर्यटन मंत्र्यांसोबत चर्चा करून हा मुद्दा मार्गी लावू, असे सांगितले. बोर व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्रात येणारे नवरगावचे पुनर्वसन आदर्श पुनर्वसन झाले असून या खात्याचा मंत्री म्हणून वनविभागाच्या या पुनर्वसनाच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. या पुनर्वसनाबाबत गावकऱ्यांशी त्यांनी चर्चा करून त्यांची सुद्धा मते जाणून घेतली. गावकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.  

यावेळी मुख्य वन संरक्षक तथा पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर, मुख्य वन संरक्षक प्रादेशिक नागपूरचे पी. कल्याणकुमार, नागपूरचे सामाजिक वनीकरण वनसंरक्षक मानकर, वर्धा उपवन संरक्षक सुनील शर्मा, वर्धा सामाजिक वनीकरण वनसंरक्षक जोशी, नागपूर वन्यजीव बोर अभयारण्याचे विभागीय वनाधिकारी आर. बी. गवई तसेच वन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक वनक्षेत्रात ट्रान्झिट उपचार केंद्राचे प्रयत्न - 
प्रत्येक वनक्षेत्रामध्ये जखमी होणाऱ्या वन्य जीवांसाठी ट्रान्झिट उपचार केंद्र असणे आवश्‍यक आहे. यामुळे प्राण्यांना तत्काळ उपचार मिळून त्यांचे प्राण वाचविता येऊ शकतात. असे केंद्र सुरू करण्यासाठी सुद्धा धोरणात्मक निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT