corona test positive in akola.jpg 
विदर्भ

बापरे! अकोल्यात एकाच दिवशी कोरोनाने चार मृत्यू; चिंतेसह चिंतन करण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अकोला शहरात ज्याप्रमाणे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे अगदी त्याच प्रमाणे या पॉझिटिव्ह रुग्णांमधील काही जणांचा मृत्यूदेखील होता आहे. आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून, एका जणाने आत्महत्या केली आहे. अशातच या दहा पैकी बुधवारी एकाच दिवशी चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही बाब अकोलेकरांसाठी चिंतेसह चिंतन करण्याची आहे.

कोविड-19 आजाराने गत 24 तासात शहरातील विविध भागातील चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सायंकाळी सांगण्यात आले. नोंदविल्या गेलेल्या मृतकांमध्ये दोन महिला या बैदपुरा भागातील, एक व्यक्ती दाना बाजार भागातील, तर एक जण खंगनपुरा भागातील आहे. यापैकी तीघांचा मृत्यू मंगळवारी झाला असून, त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आज स्पष्ट झाले. 

तर खंगनपुरा भागातील 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू बुधवारी सकाळी 8 वाजताचे दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असताना झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, बुधवारी एकून 100 अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर 93 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे. आज सकाळी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये एक महिला रुग्ण राधाकिसन प्लॉट, तर एक ताजनगर मधील आहे. 

तर सायंकाळच्या अहवालात पॉझिटिव्ह आलेले दोन रुग्ण ज्यात एक सहा वर्षिय बालिका व 20 वर्षीय युवतीचा समावेश आहे. या दोघी अनुक्रमे मेहर नगर व ताजनगर भागातील आहेत. दरम्यान, कोविड आजाराने आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 11 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT