korona.jpg 
विदर्भ

तब्बल चारशे नागरिक परतले मुळगावी; ग्रामस्थांमध्ये धास्ती

प्रदीप गावंडे

पिंजर (जि. अकोला) : ‘कोरोना’ भीतीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील शिक्षण व व्यवसायासाठी पुणे-मुंबई येथे गेलेले सुमारे 400 ते 500 नागरिक आपल्या मुळ गावी परतले आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर आरोग्य विभागाच्या चमूने 125 जणांची आरोग्य तपासणी केली आहे.

आरोग्य विभागाकडून 125 जणांची तपासणी
पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सुमारे 64 खेडी येतात. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. कोरोनाची भीती पाहता शिक्षण आणि व्यवसायासाठी मुंबई, पुणे येथे असणारी बहूसंख्य नागरिक हे आता आपल्या मुळगावी परत येत आहेत. त्यामध्ये सावरखेड येथे 7, टिटवा येथे 25, महागाव 46, जनकेश्‍वर 9, खेर्डा (भागाई) 25, वडगाव 55, घोटा 7, राहीत 17, पार्डी 4, खेर्डा खुर्द 18, मोऱ्हक 35, पारा भवानी 14, मोझरी खुर्द 28, टाकळी 5, भेंडी 45, भेंडगाव 9 यासह सुमारे 400 ते 500 नागरिक पुणे-मुंबई येथून त्यांच्या मूळ गावी आले आहेत. पिंजरमधील आकडा 75 इतका आहे. तसेच परिसरातील अन्य गावांमध्ये बाहेरगावाहून किती नागरिक दाखल झाले याचा आकडा अद्यापही उपलब्ध नाही. आतापर्यंत आरोग्य विभागाच्या चमूने 125 जणांचा तपासण्या केल्या आहेत. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू त्यासाठी सतत फिल्डवर परिश्रम घेत आहेत. डॉ. कुलकर्णी, डॉ. वाणी यांचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात केंद्रावर मास्क उपलब्ध नसल्याचे आरोग्य विभागाने डॉक्टरांना पुरेश्‍या प्रमाणात मास्क पुरवावे अशी मागणी होत आहे. तर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावी असे आवाहन पिंजर प्रा.आ.केंद्राचे डॉ.एम.एस.आगलावे, ठाणेदार आर.के.भारसाकळे, जमादार राजू वानखडे यांनी केले आहे.

नागरिकांनीही वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा
परिसरात 400 ते 500 नागरिक पुणे-मुंबई येथून परतले आहेत. 125 नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची प्राधाण्याने तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनीही वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा.
-डॉ. एम. एस. आगलावे, वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र पिंजर

नागरिकांची मदत करण्यासाठी सज्ज
कोरोनाबात शासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे. स्वताःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. शासनासोबतच आम्हीही नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज आहोत. एका फोनवर रुग्णाला आवश्‍यक त्या ठिकाणी सोडण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
-दीपक सदाफळे, सामाजिक कार्यकर्ता, पिंजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT