free cattle on road are creating problem in sindi of wardha  
विदर्भ

रस्त्यावर मोकाट जनावरांचा उच्छाद, कोंडवाडा नाहीसा केल्याने अडचण

मोहन सुरकार

सिंदी (रेल्वे) ( जि.वर्धा ) : शहरात सर्वत्र मोकाट फिरणाऱ्या जनावरांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. यांच्यामुळे सिंदीकरांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या या मोकाट जनावरांना आवरणे अवघड झाले आहे. यामुळे मोकाट जनावरांना आवरा, अशी म्हणणाऱ्यांची वेळ सिंदीवासियांवर आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. अनेक गोपालक दररोज दूध तर काढतात, मात्र दिवसभर आपली ही जनावरे शहरात मोकाट सोडून देतात. ही जनावरे दिवसभर शहरातील खुल्या घरात घुसून नासधूस करतात. ऐवढेच नाही तर शहरालगतच्या शेतात शिरून शेत पिकाची नासाडी करतात. या मोकाट जनावरांच्या त्रासामुळे शेतकरी वैतागले आहेत. याशिवाय ही जनावरे शहरातील प्रमुख रहदारीच्या रस्त्यावर मधोमध ठिय्या मांडून बसतात. परिणामी वाहन घेऊन शहरात येणाऱ्या जाणाऱ्यांना दररोज अडचणीचा सामना करावा लागतो.

शेतीव्यवसाय करणाऱ्यांचे हे शहर आहे. यामुळे येथे जनावरांची संख्या अधिक आहे. यामुळे शहरात गाई, म्हशी, बकऱ्या आणि बैल वासरांची संख्या मोठी आहे. यातील काही गुरे पाळणाऱ्यांनी नवीनच प्रकार सुरू  केला. रात्री आपल्या गोठ्यात घरी बांधलेली जनावरे सकाळी दूध काढले की शहरात हाकलून देतात. रात्री पुन्हा घरी आणून बांधतात, अशा जनावरांची संख्या वाढली आहे.

इंग्रजकालीन कोंडवाडा केला नाहीसा - 
शहरात इंग्रज काळापासून 'कांजी हाऊस' (कोंडवाडा) होता. तेव्हा अशा त्रास देणाऱ्या मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात डांबले जायचे. ही जनावरे सोडविण्यासाठी जनावरांच्या मालकाला आर्थिक दंड पडायचा. यामुळे जनावर मालक आपली जनावरे पुन्हा नासधूस किंवा त्रास देणार नाही याची काळजी घ्यायचा. मात्र, पालिकेने हा कोंडवाडा नाहीसा केल्याने अडचण निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

Shreeram Gaikwad Death Case: श्रीराम गायकवाड संशयास्पद मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी; देवगाव रंगारीत कुटुंबीय व भिल्ल समाजाचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT