SYSTEM
SYSTEM
विदर्भ

लाकडांऐवजी गोवरीच्या कांड्यांवर अंत्यसंस्कार; अमरावतीत यंत्र दाखल

सुधीर भारती

अमरावती : कोरोनामुळे (coronavirus) मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असतानाच आता अंत्यसंस्कारासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या लाकडांचीही कमतरता (Lack of wood) निर्माण झाली आहे. लाकडांसाठी झाडे तोडण्यात येतात, मात्र त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी (Will prevent damage to the environment) गायीच्या शेणापासून लाकडी काड्या (Wooden sticks from cow dung) तयार करण्याचे यंत्र विकसित करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने देशातील ७५ ठिकाणी हे यंत्र पुरविण्यात आले आहे. अमरावतीमध्ये दोन ठिकाणी हे यंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. (Funeral-on-govarya-sticks-instead-of-wood)

कोरोनामुळे देशात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. सामान्यपणे आजही गॅस किंवा विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यास अनेकजण तयार होत नाहीत. त्यामुळे साहजिकच लाकडांवर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, त्यासाठी पर्यावरणाला मोठी किंमत चुकवावी लागत आहे. एक झाड मोठे होण्यासाठी साधारणपणे १५ वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, ते झाड कापून त्यापासून मिळणाऱ्या लाकडांपासून केवळ तीन शवांवरच अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात. पर्यायाने देशभरात कोट्यवधी वृक्ष कापले गेले आहे. पर्यावरणाची ही होणारी हानी भरून काढण्यासाठी लाकडाला पर्याय म्हणून शेणाचा वापर पुढे आला आहे.

हिंदू संस्कृतीनुसार गोवरीला विविध संस्कारांप्रमाणेच अंत्यसंस्काराच्या विधीमध्ये सुद्धा मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच शेणापासून गोवऱ्याच्या काड्या तयार करण्याचे यंत्र नम्रमुनी महाराजांच्या मार्गदर्शनात विकसित करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय मंत्री प्रशांत हरताळकर, तसेच प्रांत गौरक्षा प्रमुख विजय शर्मा यांच्या माध्यमातून शेणापासून काड्या तयार करण्याचे यंत्र रासेगाव येथील गोरक्षणाला दान करण्यात आले आहे. शिवाय शंकरनगर स्मशानभूमीत एक गाडी काड्या प्रायोगिक तत्त्वावर अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आल्याचे विजय शर्मा यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, शेणापासून तयार होणारे हे लाकूड तीन फूट राहणार असून त्याचे वजन 900 ग्रॅम राहील. एका शवावर अंत्यसंस्कारासाठी साधारणपणे २५० किलो गोवऱ्यांच्या काड्या वापरात आणल्या जातील. सुरुवातीला हा प्रयोग असला तरी लवकरच अमरावतीच्या दोन स्मशानभूमींमध्ये हे यंत्र दिले जाणार आहे.

सध्या रासेगाव येथील शिवशक्ती गौरक्षण संस्थेला हे यंत्र भेट देण्यात आले असून संचालक विनायक गाडगे यांनी ते स्वीकारले. यावेळी महापौर चेतन गावंडे, गटनेते तुषार भारतीय, विजय शर्मा, अ‍ॅड. आर. बी. अटल, नगरसेवक अजय सारस्कर, बंटी पारवानी, चेतन वाठोडकर, रामविलास पासवान आदी मान्यवर उपस्थित होते.

अशी राहणार गोवऱ्यांची काडी

या यंत्रात सुरुवातीला शेण टाकले जाईल, त्यानंतर पुढील पाइपमधून तीन फुटी गोवऱ्याची कांडी बाहेर निघेल. त्यासाठी लागणारे शेण गौरक्षणाकडून घेण्यात येणार आहे.

(Funeral-on-govarya-sticks-instead-of-wood)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT