sakal
विदर्भ

आरंभी येथे आजही अंत्यसंस्कार उघड्यावरच!

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही ग्रामस्थांची परवड कायम, शेडसाठी आणलेल्या विटा १५ दिवसांत झाल्या गायब

सकाळ डिजिटल टीम

दिग्रस : तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या आरंभी गावात गेल्या अनेक वर्षांपासून उघड्यावरच नागरिकांना अंत्यसंस्कार करावे लागत आहे. विशेष म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे उजाडून गेली. मात्र आरंभीवासीयांची परवड आजही जैसे थे असल्याचे दिसून येते. हि समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आणखी किती काळ अंत पाहणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करताना दिसत आहे.

मृत्यू हे अंतिम सत्य आहे, असे म्हटले जाते. 'मरणाने केली सुटका, जगण्याने मजला छळले होते, असे सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांनी लिहून ठेवले आहे. मरणाने सुटका केली तरी ही सुटका आरंभीच्या गावकऱ्यांसाठी अभिशाप ठरताना दिसते. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात संबंधित समस्या तीव्र रूप धारण करते. गावाच्या उत्तर आणि दक्षिण भागाला वनविभागाच्या जागेवर ग्रामस्थ अंत्यसंस्कार पार पाडतात.

हक्काची आणि शेडयुक्त स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. पावसाळ्यात कधीकधी पावसात भिजून, चिखल तुडवत मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रसंगी मृतदेह पाऊस थांबेपर्यंत घरातच ठेवावा लागतो. उन्हाळ्यात देखील उन्हातान्हाचे चटके खात उभे राहून लोक अंत्यसंस्काराला हजेरी लावतात.

गावात सुरक्षित आणि हक्काची स्मशानभूमी नसल्याची शोकांतिका ग्रामस्थांना अडचणीची ठरत आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणे, मृत व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी खूपच त्रासदायक काम ठरते. गेल्या काही वर्षांपूर्वी गावाबाहेरील वनविभागाच्या जागेवर स्मशानभूमीसाठी शेडचे काम करण्यासाठी विटा आणून ठेवल्या होत्या मात्र नंतरच्या १५ दिवसांतच त्या विटा तेथून गायब झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

आरंभी नजीक असलेल्या चिरकुटा, फुलवाडी, वडगाव, झिरपूरवाडी या छोट्या गावात शेडयुक्त स्मशानभूमीची सोय आहे. मात्र लोकसंख्येने मोठे असलेल्या आरंभी गावात ही सुविधा उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लवकरात लवकर स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावून प्रेताची होणारी विटंबना थांबवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

स्मशानभूमीचे श्रेय मिळविण्यासाठी सभापतींचे राजकारण

दिग्रस पंचायत समिती मध्ये आरंभी गावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिता दिवाकर राठोड या सभापती आहेत. विद्यमान आमदार संजय राठोड हे वनमंत्री असतांना सध्या अंतिम संस्कार केली जाणारी वनविभागाची जमिन ग्रामपंचायतच्या नावे हस्तांतरित करणे काही अवघड काम नव्हते.

मात्र ग्रामपंचायत मध्ये सभापती समर्थकांची सत्ता नसल्याने त्यांनी याबाबत कोणताही पुढाकार घेतला नाही. कारण आमदार राठोड वनमंत्री असतांना आरंभी गावात स्मशानभूमीकरीता जागा व शेड मंजूर झाले असते तर विरोधी पार्टीला या कामाचे श्रेय मिळाले असते. या श्रेयवादाच्या लढाईत मात्र मृतदेहांची अवहेलना सुरु आहे, याचे सभापतींना काहीही देणे घेणे नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का

Illegal Infant Disposal Case : आक्काताई लावत होती मृत अर्भकाची विल्हेवाट, नातेवाईकांनी नकार दिल्यास थेट उघड्यावर अर्भक फेकायचे; पेशंटचीही होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026 Marathi News: जसप्रीत बुमराह MI vs KKR सामन्यात नाही खेळणार? समोर आले मोठे अपडेट्स, CoE मध्ये झालेला दाखल

SCROLL FOR NEXT