A girl born in the house of a silent couple
A girl born in the house of a silent couple 
विदर्भ

पती-पत्नी दोघेही मूकबधीर, कोणीही रोजगार देईना,,,वाचा त्यांच्या संघर्षाची कहाणी

गणेश राऊत

नेर (जि. यवतमाळ) : मातापिता जन्मजात मूकबधीर... ध्वनी काय असतो त्यांना माहिती नाही... शब्दांच्या जाणीवेचा अभाव असलेल्या मूकबधीर दाम्पत्याच्या नि:शब्द वेलीवर "सुखी' नावाची शब्दकळी उमलली आणि जीवनच धन्य झाले. सुखीच्या तोंडून आई... बाबा... हे शब्द बाहेर पडताच जणूकाही त्यांच्या मुक्‍या संवेदनाही बोलक्‍या झाल्या.. दोघांच्या जीवनातील अडलेला ध्वनी जणूकाही सुसाट आनंदाची लहरच घेऊन परत आला. 

रवींद्र जाधव व सुजाता जाधव हे मूकबधीर जोडपे... नेर तालुक्‍यातील खोलापुरी येथे राहतात... जन्मजात मूकबधीर असल्याने आयुष्यभर संघर्ष त्यांच्या वाटेला आला... दोघांची कथाही फारच रंजक... बालपणीच रवींद्रच्या वडिलांचे छत्र हरविले. आई नर्मदा यांनी दोन्ही मुलांना मोठे केले... 

मोठा मुलगा रवींद्र जन्माला आल्यावर घरात उत्सव साजरा करण्यात आला. रवींद्र जसजसा मोठा होऊ लागला तसतशी आई-वडिलांच्या चिंतेत भर पडत गेली. त्याला बोलता येत नव्हते. तो ऐकूही शकत नव्हता. हा दुःखाचा डोंगर झेलत वडील जगातून निघून गेले. त्यांनी मागे सोडल्या त्या मूक्‍या संवेदना. घरी अठराविश्‍व दारिद्य. केवळ दोन ऐकराच्या जमिनीच्या तुकड्यावर कुटुंबाचे उदरभरण सुरू आहे. 

मूकबधीर असूनही रवींद्र स्वस्थ बसला नाही. त्याने आपल्या दिव्यांगावर मात करीत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर एम.एस.सी. आय.टी. व टंकलेखन ही परीक्षा उत्तीर्ण केली. रोजगाराच्या शोधात रवींद्र सर्वत्र भटकला. नागपूर व अमरावतीपर्यंत गेला. परंतु, मूकबधीर असल्याने त्याच्या पदरी निराशाच आली. बुद्धीने अत्यंत चलाख व हुशार असूनही रोजगाराचा गंभीर प्रश्‍न त्याच्यापुढे उभा ठाकला होता. नोकरी मिळत नसल्यामुळे शेवटी त्याने शेती व मजुरीचा पर्याय निवडला.

जोडा स्वर्गात लिहिला जातो

मुलगा मजुरी करू लागल्याने आईने लग्नाचा तगादा सुरू केला. मूकबधीर व्यक्तीला कोण मुलगी देईल बरे? परंतु, म्हणतात ना "लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. घाटंजी तालुक्‍यातील पार्डी या गावी एक सुस्वरूप मूकबधीर मुलगी असल्याचे कळले. सुजाता तिचे नाव... सुजाता ही मूकी आणि बहिरी... 12 मे 2018 ला रवींद्र व सुजाता यांचा विवाह झाला. एकमेकांना खाणाखुणा करीत त्यांची हितगूज चालायचे. हातवारे व चेहऱ्यावरील भाव हीच त्यांची भाषा. "या मनाचे त्या मनी कळेल' अशी ती चेहऱ्याची भाषा, जणूकाही त्यांच्या जगण्याची उर्जा बनली.

सुखाची लकेर होऊन आल्याने ठेवले 'सुखी' नाव

रवींद्र व सुजाता यांचा संसार हळूहळू फुलू लागला. एकेदिवशी नवीन पाहुण्याची चाहूल लागली. आनंदाला जणू भरतीच आली. त्यांच्या नि:शब्द संसारवेलीवर शब्दकळी उमलली. त्यांच्या आयुष्यात ती सुखाची लकेर होऊन आल्याने तिचे नाव "सुखी' ठेवले. सुखी हळुहळू रांगत होती. ओठ हलवत होती. तेव्हा तिच्या ओठातून बोबडे बोल बाहेर पडायचे... जेव्हा ती आई... बाबा... म्हणायला शिकली तेव्हा रवींद्र व सुजातांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांच्या मुक्‍या संवेदनाही बोलक्‍या झाल्या. आयुष्याचा अर्थच जणूकाही त्यांना कळला इतके ते धन्य झाले. 

मूकबधीर असल्याने कामाची पंचाईत

रवींद्र व सुजाता हे दोघेही मूकबधीर असल्याने त्यांना काम मिळत नाही. दोन एकरांतील पिकांत त्यांचा खर्च भागत नाही. त्यांना काम हवे आहे. फुकटचे काहीच नको. लोकांनी काम द्यावे किंवा सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा रवींद्र जाधव यांनी "सकाळ'जवळ व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT