विदर्भ

चंद्रपूर : माराई देवीला बकरा चढवला अन् सोडला; मात्र...

संदीप रायपूरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी गावात माराई देवीला बकरा देण्याची प्रथा आहे. गावातील प्रत्येक जण आपापल्या परीने दहा-वीस रुपये जमा करून बकरा विकत घेतात. पूजा करून बकरा माराई देवीला चढवला जातो. यानंतर तो बकरा सोडण्यात येतो. मात्र, तो बकरा चोरण्याचा प्रयत्न भामट्यांनी केला. गावकऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला अन् प्रयत्न फसला. करंजीत घडलेल्या या प्रकाराची रंजकदार चर्चा सुरू आहे.

खेड्यात माराई देवीला मोठे महत्त्व आहे. विशेषतः श्रावण मासात गावागावात माराई देवीची पूजाअर्चा केली जाते. लोक वर्गणी गोळा करून बकरा विकत घेतात आणि देवीला बहाल करून सोडून देतात. गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावातही लोकांनी वर्गणी केली आणि बकरा विकत घेतला. माराई देवीची पूजा केली अन् बकऱ्याला सोडून दिले. या बकऱ्यावर गावातील तीन भामट्यांची नजर होती.

रविवारी रात्रीच्या सुमारास सारे झोपले असतील म्हणून तिघांनी बकरा चोरण्याचा बेत आखला. एकाने खांद्यावर बकरा घेतला व दूरवर जाण्याच्या तयारीत होता. याचवेळी गावातील एकाने हा प्रकार बघितला. त्याने बोंबाबोंब करताच बकऱ्याला सोडून ते पसार झाले. दुसऱ्या दिवशी या मुद्यावर तंटामुक्त समितीची बैठक झाली. बकरा चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी कबुलीही दिली.

सारी बाजू लक्षात घेत समितीने त्यांच्यावर तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. परंतु, गावातील काहींनी पोलिसांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. माराईदेवीला बहाल केलेला बकरा चोरण्याचा प्रयत्न करण्याच्या घटनेची रंजकदार चर्चा आता परिसरात सुरू आहे.

अखेर गुन्हा दाखल

बकरा चोरी करण्याचा प्रयत्न फसल्याची माहिती मिळताच प्रकरण तंटामुक्त समितीकडे गेले. तंटामुक्त समितीने भामट्यांवर तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. परंतु, काहींनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. यांनतर त्या भामट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prani More: 'शेर आया.. शेर आया...' bigg boss 19 च्या घरात प्रणित मोरेची अशी होणार पुन्हा एन्ट्री? प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले....

Thane News: एकाच व्यक्तीच्या नावे दोन मतदान ओळखपत्र, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार उघड

DeepakAba Salunkhe-Patil: कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार : माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील; भूमिकेकडे लागले सर्वांचे लक्ष

Long Weekend 2026: नवीन वर्षात 14 लाँग वीकेंड, आत्ताच चेक करा संपुर्ण यादी एका क्लिकवर

Viral News : तब्बल ६५ वर्षे क्षणभरही झोपले नाहीत हे आजोबा, रात्रंदिवस डोळे असतात सताड उघडे; डॉक्टर देखील हैराण

SCROLL FOR NEXT