Government policy is responsible for the accident at Bhandara Bhandara hospital fire news 
विदर्भ

भंडारा येथील दुर्घटनेस शासकीय धोरण जबाबदार; कंत्राटदार, अभियंता संघटनांचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

पुसद (जि. यवतमाळ) : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील दहा नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेस राज्य शासनाचे एकत्रित बांधकामांचे मोठे कंत्राट एकाच बड्या कंपनीला देण्याचे चुकीचे धोरण व नीती जबाबदार असल्याचा आरोप राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

मागील सरकारने २०१५ साली राज्यात अभ्यास न करता शासकीय इमारती, रस्ते बांधकाम यासंदर्भात एकत्रित निविदा काढून एकाच बड्या कंपनीला कंत्राट देण्याचे एक नवीन धोरण अमलात आणले व सध्याचे सरकार सुद्धा हेच चुकीचे धोरण तसेच पुढे रेटत आहे. त्यामुळे भविष्यात या धोरणात आमूलाग्र बदल न केल्यास अशा अनेक दुर्घटनांस पुढील काळात आमंत्रण मिळण्याची भीती आहे.

पूर्वी शासकीय इमारती, कार्यालये, दवाखाने, रस्त्यांची व इतर शासकीय कामे छोट्या अंदाजपत्रकात निघत असत. या कामांचे ५० हजारपासून २० लाखापर्यंत अंदाजपत्रक तयार करून ई-निविदा मागविण्यात येत. ही छोटी कामे लहान कंत्राटदार निविदा भरून करीत. लहान कंत्राटदारांची संख्या भरपूर असल्याने कोणतीही दुर्घटना घडण्याआधी ही कामे वेळेत पूर्ण होत असे.

परंतु मागील सरकारने हे धोरण बदलले. नव्या धोरणानुसार एकाच आवारातील आठ- दहा इमारती, कार्यालये, रस्ता या सर्व एकत्रित कामांची कोट्यवधी रुपयांची निविदा काढण्यात येते. ही प्रणाली अंमलात आणताना त्याचे दुष्परिणाम काय होतील, याचा काहीही अभ्यास न करता फक्त आर्थिक फायदा एकाकडून होईल व एकाकडूनच वसुलीही करता येईल, एवढे एकच भक्कम कारण यांस कारणीभूत आहे, असे संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे.

निवेदनातून विविध सूचना

शासनाने जुन्या परंपरागत पद्धतीने छोट्या कामांची निविदा काढावी. छोटी कामे काढून तातडीने पूर्ण करावयाच्या पद्धतीचा अवलंब करावा. तसेच ई-निविदा प्रणालीची असलेली तीन लाखांच्या मर्यादेत वाढ करून २० लाख करावी, अशा सूचना संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी निवेदनातून केल्या आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT