market floor sakal media
विदर्भ

Amravati : शासनाचा लाखोंचा खर्च पाण्यात; २० लाखांचे बाजारओटे

बाजारासाठी महानगर तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बाजारओटे बांधण्यात आले आहेत.

प्रशिक मकेश्वर.

तिवसा (जि. अमरावती) : बाजारासाठी महानगर तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बाजारओटे बांधण्यात आले आहेत. मात्र, त्याचा उपयोग होत आहे काय, हे पाहण्यासाठी कुणालाच वेळ नाही. तिवसा नगरपंचायतच्या वतीने २० लाख रुपये खर्च करून भाजी व फळ विक्रेत्यांसाठी मोठे बाजारओटे तसेच त्यावर टीनाचे शेड बांधण्यात आले. मात्र याठिकाणी भाजीविक्रेते बसण्यास तयार नसून अजूनही अतिक्रमित जागेवरच व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे हा खर्च वाया गेला आहे.

मागील वर्षी जुन्या नगरपंचायत कार्यालयासमोरचे अतिक्रमण काढून मुख्याधिकारी डॉ. पल्लवी सोटे यांनी मोठी कारवाई केली होती. येथील भाजी व फळविक्रेते, अशा किरकोळ व्यावसायिकांमुळे मुख्य रस्त्यावरून चालणे कठीण होत होते. त्यामुळे नगरपंचायतने सर्वांना जागा निश्चित करून मटण मार्केटला लागून असलेल्या खुल्या जागेत साहाय्य योजना निधी अंतर्गत बाजारओट्यांचे बांधकाम करून दिले.

त्याठिकाणी ईश्वरचिठ्ठीने व्यवसायाकरिता ओट्यांचे वाटप केले. मात्र खऱ्या अर्थाने याचा उपयोग होतो आहे का? हा प्रश्न यानिमित्याने उपस्थित केला जातो आहे. २० लाखांची उधळपट्टी केवळ कंत्राटदाराच्या घशात घालून नगरपंचायत प्रशासन झोपेचे सोंग घेत तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

कायमस्वरूपी व्यवस्था करा

शहरात मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी बाजार भरतो. राष्ट्रीय महामार्गापासून तर जुन्या नगरपंचायतच्या कार्यालयापर्यंत बाहेरून येणाऱ्या हातगाड्या, भाजीविक्रेते व इतर व्यावसायिकांमुळे रस्त्यावरून नागरिकांना चालणे कठीण होते. मात्र तरीसुद्धा नगरपंचायत प्रशासनाकडून काही ठोस पावले उचलले जात नसल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर बसणाऱ्या किरकोळ व्यावसायिकांची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक व व्यावसायिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT