Gram Panchayat Elections Results Updates in Yavatmal district  
विदर्भ

Gram Panchayat Elections Results: प्रस्थापितांना धक्का नव्यांना संधी; समीकरणं बदलणार 

सकाळ डिजिटल टीम

नेर (जि. यवतमाळ) : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. यात अनेक राजकीय पक्षांची धूळधाण  दिसत आहे तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची चिन्हं दिसत आहेत.  

तालुक्यातील एकूण पन्नास ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत एक अविरोध आल्याने एकूण ४९ ठिकाणी निवडणुका घेण्यात आल्या. यात अनेक ग्रामपंचायतीत प्रस्थापितांना धक्का देत जनतेने नव्याना संधी दिली. काही दिग्गजांना नवख्यांनी धूळ चारल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत

तालुक्यातील शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोज नाल्हे, काँग्रेसचे विनायक भेंडे यांनी आपला गढ राखला तर भाजपचे अनिल राठोड यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पाथ्रड येथील माजी सभापती मनीषा उमेश गोळे यांना पक्षातील नवख्यांनी धूळ चारत मात केली. तालुक्यातील चिकणी ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या ठिकाणी शिवसेनेचे दोन जिल्हा परिषद सदस्य आणि आर पी आय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष मोहन भोयर यांच्यात लढत होती.

यात निखिल जैत यांच्या पाच तर भोयर यांच्या चार उमेदवार निवडून आले. तालुक्यातील टाकळी सलामी येथील दिनेश चौधरी आणि रवींद्र कास्टे यांना प्रत्येकी १६९ मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात रवींद्र कास्टे विजयी झाले. निवडून आलेल्या अनेकांच्या भावना अनावर झाल्या. अनेक गावात सत्तांतर पहावयास मिळाले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : मराठ्यांनो, १५ तारखेला मी एकटाच मुंबईला जातोय, आता मला कोण आडवतोय ते बघतोच, मनोज जरांगे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT