grampanchayat election will held soon in yavatmal 
विदर्भ

यवतमाळमध्ये लवकरच ग्रामपंचायत निवडणुकीचे वाजणार बिगूल, राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना

चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुका व दुसऱ्या टप्प्यातील प्रभागरचनेचा कार्यक्रमही कोरोनामुळे स्थगित करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी दुसऱ्या टप्प्यात असलेल्या ग्रामपंचायतींची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून जिल्ह्यात 'ईव्हीएम' मशीनची प्राथमिक तपासणी सुरू झाली असून, लवकरच बिगूल वाजण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पाचशेवर व दुसऱ्या टप्प्यातही तेवढ्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार होत्या. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रही दाखल झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यांतील सर्व प्रक्रियाही स्थगित करण्यात आली. त्यानंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच क्षेत्र सुरू करण्यात येत आहेत. शासकीय कार्यालयातही आता कोरोनाव्यतिरिक्त कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या टप्प्यातील अर्धवट असलेला प्रभागरचना व आरक्षण पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक विभागाला आले होते. त्यानुसार ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर आता पहिल्या टप्प्यातील निवडणुकाही लवकरच होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक विभागाला 'ईव्हीएम' मशीनची प्राथमिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चार दिवस ही तपासणी केली जाणार आहे. सध्या निवडणूक विभागाकडून तपासणी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या माध्यमातून ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक विभागाचे कैलास निमकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यवाही सुरू आहे.a

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मुश्रीफ सांगतील तेच, अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला तर भाजपकडून महाडिकांच्या विश्वासू शिलेदाराची निवड

अरे वाह! 'पारु' मालिकेनंतर प्रसाद जवादेला मिळाली नवी मालिका, पूर्वा कौशिकसोबत नवी जोडी, प्रोमो Viral

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

SCROLL FOR NEXT