lockdown 
विदर्भ

लॉकडाउनच्या मानसिक जखमा निघताहेत भरून; सण, उत्सवांमुळे आले नवचैतन्य 

सुधीर भारती

अमरावती ः सततच्या लॉकडाउनमुळे मनाला झालेल्या मानसिक जखमा आता हळूहळू भरून निघत असल्याचा निष्कर्ष मानसिक आरोग्य क्षेत्रात काढला जाणवू लागला आहे. असे असले तरी लॉकडाउनच्या काळात दबलेल्या मानसिक भावना उफाळून येण्याची दुसरी शक्‍यतासुद्धा वर्तविली जात आहे. दसऱ्यानंतर आता दिवाळीमुळे जीवनात नवचैतन्य परतल्याची भावना निर्माण झाली आहे. 

कोरोनामुळे मार्चमध्ये सुरू झालेल्या लॉकडाउनने जीवन जगण्याचे सर्व संदर्भच बदलून गेले. अनेकांचे आडाखे उद्‌ध्वस्त झाले तर अनेकांना बरेच काही गमवावे लागले. मात्र, या संकटातही समाजातील एक मोठा वर्ग मानसिक दृष्टीने स्टॅण्डबाय राहिला, असा अभ्यास तज्ज्ञांनी व्यक्त केला. लॉकडाउनच्या काळात नोकऱ्या, भविष्याची चिंता, आरोग्य या चिंताजनक बाबींनाही अनेकांनी कुरवाळून स्वतःजवळ ठेवले. त्यामुळे एक मोठा वर्ग नैराश्‍याच्या गर्तेत सापडला गेला.

लॉकडाउनमुळे एसटी बसेस, खासगी वाहनांची सेवा पूर्णपणे बंद असल्याने आधीच मानसिक रोगाचा उपचार घेणारे रुग्ण शासकीय रुग्णालयांकडे फिरकलेदेखील नाहीत. त्यांनी कदाचित खासगी डॉक्‍टरांकडे धाव घेतली असावी किंवा घरच्या घरीच स्वतःला स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न केला असावा, असे जाणकारांचे मत आहे. मात्र, आता कोरोना काळातही अनलॉक झाल्यानंतर अनेकांनी मानसिकता जपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

अनलॉकनंतर लॉकडाउनच्या मानसिक जखमा भरून निघत आहेत. सण, उत्सव मोकळेपणाने साजरे करण्याकडे सर्वांचा कल दिसून येतो. त्यातच दिवाळीची खरेदी, गजबजलेली बाजारपेठ, दिवाळीत नातेवाइकांच्या गाठीभेटी या सर्वांचा परिणाम मनुष्याच्या अंतर्मनावर होत असतो. पर्यायाने लॉकडाउनच्या तुलनेने सध्याच्या अनलॉकमध्ये बहुतांश मंडळींच्या मनावरील ताण, मरगळ, औदासिन्य, चिंता दूर झाल्याचे दिसत आहे. मात्र, मानसिक आरोग्याचा विचार करता लॉकडाउनमध्ये दबलेले अनेक नकारात्मक विचार, भविष्याची चिंता या बाबी दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे आता नवीन रुग्ण वाढण्याची शक्‍यतासुद्धा व्यक्त होत आहे. मात्र, या गोष्टीचा सकारात्मक विचार केला असता जीवन पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.  

कोरोनाच्या संकटकाळात आपण जिवंत राहणे हीच मोठी प्राथमिकता असली पाहिजे. हे संकट केवळ आपल्या एकट्यापुरते मर्यादित नसून वैश्‍विक आहे. त्यामध्ये प्रत्येकजण भरडला गेला आणि जात आहे, ही भावना ठेवणे गरजेचे आहे. या संपूर्ण पर्वात आपण एकटे नसून आपल्यासोबत सर्वजण आहेत. कोरोना काळात अनेकांचे सर्वकाही गेले आहे, ही भावना ठेवून सकारात्मकतेने पुढील पाऊल टाकले पाहिजे. मानसिक आजारी असणाऱ्यांनी तसेच चिंता, औदासीन्य वाटणाऱ्यांनी तत्काळ मानसोपचारतज्ज्ञांशी संपर्क साधला पाहिजे.

- डॉ. अमोल गुल्हाने, 
मानसोपचारतज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT