panyach taki. 
विदर्भ

वरोडी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

सांगळूद : येथून जवळच असलेल्या वरोडी येथील सांडपाण्याची व्यवस्थित विल्हवाट लावण्यात आली नाही. रोडच्या बाजुला बांधण्यात आलेल्या नालीचा उतार व्यवस्थित काढला नसल्याने संपूर्ण गावातील सांडपाणी पाणी पिण्याच्या टाकीजवळ करण्यात आलेल्या शोष खड्ड्यात जमा होत आहे. त्यामुळे येथे लागूनच असलेल्या हातपंपाचे पाणी पिणे भरणे देखील कठिण झाले आहे. अशातच परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षापासून मुख्यकार्यकारी अधिकारी व अकोला गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे खड्याचे काम करण्याची विनंती केली होती. परंतु, आजपर्यंत त्यांच्याकडून कुठलिच कारवाई न झाल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर निघत आहे.


हेही वाचा - पतीच्या उपचारासाठी जिंकली होती मॅरेथॉन स्पर्धा!
परिसराच पसरली दुर्गंधी

गावामध्ये सिमेंटच्या रोडला लागून नवीन नाल्याचे काम करण्यात आले. परंतु, संबंधित कंत्राटदारांनी नाल्याचा पाण्याचा उतार व्यवस्थित काढला नसल्याने पाणी नाल्यामध्येच जमा होते. तर कधी नाल्यावरून वाहते. सर्व नाल्याचा उतार मुख्य नालीला न जोडता पाण्याच्या टाकी व हातपंपाच्या मधोमध असलेल्या खुल्या जागेत ग्रामपंचायत प्रशासनाने २० बाय १० चा शोष खड्डा करून त्यामध्ये संपूर्ण गावाचे सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे खड्ड्याला तलावाचे स्वरुप आले आहे. यामध्ये डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी वाढली आहे. पाणी तेथेच साचत असल्याने हातपंपाचे पाणी देखील वापरण्यासाठी नागरिक खाबरत आहेत.


अनेक वेळा केली मागणी
खुल्या जागेला व्यवस्थित तार-कंम्पाऊंड लावले नसले नाही. आजुबाजुला लहान-लहान मुल खेळतात त्यामुळे एखादी मोठी घटना घडू शकते. परिसरात राहत असलेल्या नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, हिवताप किंवा साथीच्या आजार लागण्याची भीती निर्माण झाली आहे. नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे खड्ड्या बाबत वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला काम करून सांडपाण्यची गावाबाहेर विल्हवाट लावण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु, त्यांच्याकडून कुठलिही कारवाई झाली नसल्याचे पाहूण, स्थानिक रहिवासी प्रवीण दयाराम पोहरे यांनी (ता.१३ मे २०१९) ला मुख्याधिकारी व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना न्याय मागण्यासाठी निवेदन दिले.

अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण
आज जवळपास सात महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी देखील संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलिही कारवाई केली नसल्याने, परिसरात राहणाऱ्या नागरिकाकडून नाराजीचा सूर निघत आहे. अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आता वरिष्ठ अधिकारीच सामान्य नागरिकांच्या समस्याचे निनाकरण करत नसतील तर न्याय कोणाकडे मागवा असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. तरी याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.


लवकरच समस्या मार्गी लागणार
खड्ड्यामधील पाणी साचत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांना त्यासंबंधी नोटीस सुद्धा बजावल्या आहेत. लवकरच समस्या मार्गी लागणार आहे.
-पुष्पा रामटेके, ग्रामसेवक, वरोडी

क्लिक करा - व्हाट्सअपच्या माध्यमातून एकत्र आली भावंडे
मोठा अपघात होण्याची शक्यता

खड्डा बुजविण्याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती केली आहे. परंतु, त्यांच्याकडून कुठलिच कारवाई होत नसल्याचे पाहूण मुख्याधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना (ता.१३ मे २०१९) तक्रार केली. त्यांच्याकडून देखील शोष खड्डा बुजविण्यात आला नाही. जोपर्यंत काही मोठा अपघात होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना जाग येणार नाही.
-प्रवीण पोहोरे, तक्रारकर्ता वरोडी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT