File photo
File photo 
विदर्भ

प्रत्येकाच्या दारी आरोग्यसेवा

सकाळवृत्तसेवा

प्रत्येकाच्या दारी आरोग्यसेवा
नागपूर : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसुविधांचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक गरजू रुग्णांच्या घरादारापर्यंत आरोग्यसेवांचा लाभ पोहोचवून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविण्याचे पुण्यकर्म अटल आरोग्य महाशिबिराच्या माध्यमातून होत आहे. चार वर्षांत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेअंतर्गत तातडीच्या उपचारासाठी 450 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आल्याने अनेकांचे प्राण वाचवू शकलो असे सांगत पुढील टप्प्यात नागपुरातील उर्वरित मतदारसंघांत आरोग्य शिबिर घेण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात आयोजित अटल महाआरोग्य शिबिराचे उद्‌घाटन करताना मुख्यमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव, माजी खासदार अजय संचेती, सचिव डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, सिने अभिनेते नागेश भोसले उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यभरात आयोजित आरोग्य शिबिरांतून 20 लाखांवर रुग्णांच्या आरोग्याची तपासणी केली. यातील 2 ते अडीच लाख रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत 50 कोटी लोकांना आरोग्यदायी लाभ देणारा जगाच्या पातळीवर भारत एकमेव देश आहे. राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून 90 टक्के नागरिकांना एक हजारपेक्षा जास्त रोगांसाठी मोफत उपचार देण्यात येतात.
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन म्हणाले, पैशाअभावी उपचार घेता आले नाहीत, अशी स्थिती राज्यात असणार नाही. अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट म्हणाले, राज्यातील जनतेला रुग्णांना औषधे आणि गरिबांना अन्न-धान्य उपलब्ध करून देण्यास शासन सक्षम आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अटल ओरल हेल्थ मिशनच्या वेबसाइटचे उद्‌घाटन करण्यात आले. बांधकाम कामगारांना विविध योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या लाभाच्या रकमेचे धनादेश वितरणासहित नोंदणी करण्यात आली. यावेळी राज्यातील नामांकित डॉक्‍टर्सचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन रामेश्‍वर नाईक यांनी केले. आभार रमेश भंडारी यांनी केले.
नागपूरकरांना एम्सचे आरोग्यदायी कवच
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, केंद्र शासन व राज्य शासनामार्फत जनतेला विविध योजनांतून आरोग्य कवच गरिबांसाठी आहे. दक्षिण-पश्‍चिमसह नागपुरातील इतरही मतदारसंघात असे शिबिर घेण्याची सूचना करीत गडकरी यांनी नागपुरात "एम्स'च्या माध्यमातून जनतेसाठी आरोग्यदायी कवच सुरू झाले असल्याचे सांगितले. उत्तर नागपुरात सिकलसेलचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, याकडे गडकरींनी लक्ष वेधले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT