File photo
File photo 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 हिंगणघाटमध्ये प्रमुख उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

मंगेश वणीकर

हिंगणघाट (जि. वर्धा) : हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारसभेला राज्यातील दोन मोठ्या राजकीय नेत्यांनी आपली हजेरी लावली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या घणाघाती भाषणातून विद्यमान सरकारवर आसूड ओढले. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा ही विकासकामांवर केंद्रित होती. या मतदारसंघात अनुभवी प्रमुख उमेदवारांचा भरणा आहे. त्यातच गत निवडणुकीने दिलेले धक्‍के उमेदवारांकरिता आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारे होते. त्यामुळे यंदाची निवडणूक सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणारी राहील.
निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार अशोक शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. याशिवाय विदर्भ आघाडी समर्थित उमेदवार स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर मतांचा जोगवा मागत आहेत. काही उमेदवारांची सामाजिक जुळवाजुळवही सुरू आहे. सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेते ऍड. सुधीर कोठारी यांची शरद पवार यांच्या सभेतील अनुपस्थिती, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या सारिपाटावर आता एकूण 13 उमेदवार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार समीर कुणावार यांनी एकतर्फी विजय मिळवून सर्वांना चकित केले होते. हा कित्ता गिरवण्याचा संकल्प घेऊन ते मैदानात उतरले आहेत. त्यांचा विजयरथ रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार राजू तिमांडे, युतीत बंडाळी करून अपक्ष म्हणून उभे असलेले माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी आपली कंबर कसली आहे. त्यांच्यासह अन्य उमेदवारांचा वेगवेगळ्या माध्यमातून या लढतीत रंग भरण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभेत स्थानिक सरकार नेते ऍड. सुधीर कोठारी यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला.
आजपर्यंतच्या संपूर्ण राजकारणात माजी आमदार राजू तिमांडे आणि बाजार समिती सभापती ऍड. कोठारी हे दोघेही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून दिसायचे. मग ती निवडणूक कोणतीही असो; परंतु यंदा उमेदवारीवरून दोघांत चांगलेच मतभेद झाले. राष्ट्रवादीने तिमांडे यांच्या पारड्यात वजन टाकून त्यांना उमेदवारी जाहीर केली, तेव्हापासून ऍड. कोठारी यांनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले आहे.

मनसेच्या पाठिंब्याने कुणावार यांना ताकद
आमदार समीर कुणावार यांच्याजवळ त्यांनी केलेल्या दोन हजार कोटींच्या विकासाची जंत्री आहे. हाच पाढा वाचत ते मतदारांसमोर जात आहेत. त्याचवेळी युतीत बंडाळी करून शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अशोक शिंदे हे अपक्ष उमेदवारी लढवत आहेत. राजकारणातील प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांवर आजही त्यांची पकड आहे. त्यांना मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे, या पाठिंब्यावरूनही मनसेमध्ये दोन मतप्रवाह पाहावयास मिळत आहे. या पाठिंब्याचा अशोक शिंदे यांना कितपत फायदा होईल, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT