home minister anil deshmukh criticized devendra fadnavis in amravati 
विदर्भ

'नागपुरातील अव्वल क्रमांकाचा गुंड कोणाचा कार्यकर्ता आहे? फडणवीसांनी उत्तर द्यावे'

प्रशिक मकेश्वर

अमरावती : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यावेळी गृहमंत्री पद देखील त्यांच्याकडेच होते.  त्यांच्या नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढली होती. तसेच मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे वाढले होते. हत्येच्या घटना सुद्धा घडल्या. याची संपूर्ण राज्यभर चर्चा होती. त्यावेळी नागपूरसह राज्यात कशी काय गुंडगिरी वाढली? तसेच नागपूर शहरातील नंबर एकचा गुंड मुन्ना यादव हा कोणाचा कार्यकर्ता आहे? याचे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यावे? असा सणसणीत सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. त्यालाच गृहमंत्र्यांनी अमरावतीत प्रत्युत्तर दिले. 

गुंड मुन्ना यादव हा फरार होता. तेव्हा आमचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. गुंड मुन्ना यादव याचा खरा तपास करायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांचा मोबाईल तपासावा. त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांचे खरे लोकेशन मिळेल, असा आरोपही त्यावेळी मुंडे यांनी केलेला होता, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील गुन्हेगारीवर पोलिस खात्याकडून 100 टक्के कारवाई केली जात आहे, तर पोलिसांवर हल्ला करणाऱ्याची कुठल्याही परिस्थिती गय केली जाणार  नाही, असे यावेळी देशमुख म्हणाले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? -

राज्यात सर्रास अवैध धंदे चालले आहेत. दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात नेत्यांच्या आशिर्वादाने सर्रास दारू विक्री केली जाते, असाही आरोप फडणवीसांनी केला. तसेच राज्यात गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, असेही ते म्हणाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

गोरं होण्यासाठी औषधांचं अतिसेवन बेतलं जीवावर? डोळ्यातून रक्त, मृतदेह पालथा; २२ वर्षीय BAMS डॉक्टरच्या मृत्यूने अमरावतीत खळबळ

Latest Marathi News Update : आम्ही ECI च्या विवेकाधिकाराची जागा घेऊ शकत नाही - सुप्रीम कोर्टाचं महत्वाचं निरीक्षण

SCROLL FOR NEXT