sangrampur.jpeg 
विदर्भ

कोरोनाची धास्ती; दुपारीच झाली बाजारपेठ बंद

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : शहरात शनिवारी दुपारीच बाजारपेठ बंद करण्यात आली. यासाठी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी फिरून जीवनावश्यक दुकाने सोडून पानटपरी, हॉटेल्स, चहा-टपरी, जनरल स्टोअर्स, कृषी केंद्र, कापड दुकाने, रेडिमेड, हार्डवेअर आदी सर्व दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या. एकदम बाजार पेठ बंद करण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये हालचाल वाढल्याचे दिसून आले.

आरोग्याच्या सुरक्षतेसाठी कडक निर्णय
प्राप्त माहिती नुसार, सद्यस्थितीत ‘कोरोना’ बाबत शासन नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा म्हणून कडक निर्णय घेताना दिसत आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी ज्यामुळे लोकांची गर्दी होणार नाही यावर स्थानिक यंत्रणेच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. याचाच भाग म्हणून शनिवारी दुपारी 12 वाजताचे दरम्यान नगर पंचायत कडून बाजार पेठ बंदचे फर्मान काढण्यात आले. ‘कोरोना’ संदर्भात या भागात नागरिक गोंधळलेल्या स्थितीत असल्याचेही चित्र आहे.

बाहेरून येणाऱ्याची संख्या वाढली
तालुक्यातून रोजगारासाठी बाहेर शहरात गेलेले ‘कोरोना’च्या धास्तीने गावात परत येत आहेत. दररोज येणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. गावात बाहेरून येणाऱ्यांनी ग्रापंचायत किंवा आशाकडे नाव नोंदणी करावी. अशा सूचना गावागावात दवंडी मार्फत देण्यात आल्याने प्रत्येक जण सतर्क होत असल्याचेही दिसत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यासाठी दररोज येणाऱ्यांची सख्याही वाढतच आहे. या ठिकाणी थर्मामीटर शिवाय कुठलीच सुविधा नसल्याने ड्युटीवरील अधिकाऱ्यांना मोठा पेच निर्माण होत आहे. कारण शहरातून येणाऱ्यांची ‘कोरोना’ बाबतची तपासणी करायची म्हटली तर अकोला किंवा बुलडाणा पाठवावे लागत आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला तपासणीसाठी पाठवायचे म्हटले तर त्या ठिकाणी गर्दी वाढण्याची भीती. असा संभ्रम घेऊन वारंवार वरिष्टांच्या सल्ल्याने येथील कार्यभार सुरू असल्याचे दिसत आहे. सोबतच बाहेरून आलेल्यानी एकदम घाबरून न जाता गावात काही दिवस एकांत राहावे असा सल्ला आरोग्य केंद्रातून दिला जात आहे.

खासगी वाहनांची प्रवासी वाहतूक बंद
वरवट बकाल-तेल्हारा, व सोनाळा रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहन धारकांनी ‘कोरोना’च्या धर्तीवर गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने शनिवारपासून प्रवासी वाहतूक करण्याचे टाळले आहे. या दोन्ही रस्त्यावरील खासगी वाहने पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय वाहन धारकांनी पोलिसांच्या विनंतीवरून घेतल्याचे समजते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची अधिकृत विक्री सुरू; मुंबईतील Apple Store बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी

Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT