House Burn out due to gas leakage in Bhandara district  
विदर्भ

स्वयंपाक करताना महिलेला अचानक आली दुर्गंधी अन् क्षणात उध्वस्त झाला सुखी संसार; परिसरात हळहळ 

दीपक फुलबांधे

लाखांदूर (जि. भंडारा) : स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे आग लागल्याने संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाल्याची घटना बुधवारी रात्री येथील प्लॉट परिसरात घडली. आगग्रस्त राजू लोनबले यांचे यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सदर व्यक्तीचे प्लॉट परिसरात कौलारू घर आहे. बुधवारी संध्याकाळी कुटुंबातील महिला स्वयंपाक करीत असताना सिलिंडरमधून गॅसची अधिक प्रमाणात गळती झाली. यामुळे काही वेळाने भडका उडून घराला आग लागली. यावेळी उपस्थितांनी घरातून पळ काढल्याने जीवित हानी झाली नाही. तथापि, या घटनेत घरातील सर्वच संसारोपयोगी साहित्य व घर जळाल्याने मोठ्या नुकसान झाले आहे. 

या आगीत जुन्या घरातील लाकूडफाट्याने पेट घेतल्यामुळे आगीने उग्र स्वरूप धारण केले होते. परंतु, परिसरातील नागरिकांनी तातडीने आग विझविण्यास सुरूवात केल्यामुळे लवकरच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या घटनेची माहिती नागरिकांनी लाखांदूर पोलिसांना दिल्यावर पोलिस उपनिरीक्षक अमोल कोकाटे, पोलिस कर्मचारी राजेश शेंडे व इतर कर्मचारी घटनास्थळी आले. तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. सौरभ कावळे, निखिल गाडगे, श्री. चव्हाण व अन्य कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

यावेळी परिसरातील घरांपर्यंत आग पसरू नये तसेच विजेचा धोका टाळण्यासाठी तत्काळ वीज पुरवठा बंद करण्यात आला. मात्र, संबंधित कुटुंबाचे लाखोचे नुकसान झाले आहे. सिलिंडरचा स्फोट होऊ नये यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, अचानक आग लागल्याने या कुटुंबाला राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून तत्काळ मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता; ऑपरेशन सिंदूरचा आदेश चिठ्ठीतून पोहोचला, नेमकं काय घडलं होतं? धक्कादायक खुलासा

AUS vs BAN: ऑसी दिग्गजांचा पारा चढला! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाँटिंगसह माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला सुनावलं

Police Honour: उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

Marathi News Live Updates : हायकोर्टाच्या परीक्षेत गडबड, कल्याणमध्ये विद्यार्थ्यांनी अडवली न्यायाधीशांची गाडी

SCROLL FOR NEXT