St bus
St bus 
विदर्भ

अरे व्वा, किती छान! एसटी बसमधून करायला मिळणार आता राजासारखा प्रवास! 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दोन प्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. नवीन निर्णयानुसार एसटी बसच्या एका सीटवर दोन प्रवाशांना बसण्याची व्यवस्था असतानाही आता एका सीटवर केवळ एकाच प्रवाशाला बसून प्रवास करावा लागणार आहे. 

कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूच्या प्रादुर्भावापासून जनतेचे रक्षण करण्यासाठी सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी संस्था कामाला लागल्या आहेत. सगळीकडे जनजागृती करण्यात येत आहे. एसटी महामंडळाने सुद्धा कोरोनाविरुद्धच्या या युद्धात उतरून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही विशेष निर्णय घेतले आहेत. या निर्णयानुसार एसटी बसमधून प्रवास करताना प्रवाशाला एका सीटवर आता एकट्यालाच बसावे लागणार आहे. वाहकाच्या बाजूच्या सीटवर कोणी बसणार नाही, तर त्याच्या पाठीमागच्या सीटवर वाहकाच्या विरुद्ध दिशेने प्रवाशांना बसावे लागेल, या पद्धतीने ही व्यवस्था करण्यात आली आहे.

खबरदारीचा उपाय

खबरदारीचा उपाय म्हणून महामंडळाकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. विविध सामाजिक संघटनांसाठी राखीव असलेली आसनव्यवस्था राखीव राहणार नाही. बसमधील आसनक्षमता पूर्ण झाल्यावरही प्रवासी शिल्लक राहिल्यास त्यांच्यासाठी जादा फेरी सोडावी. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शयनयान बसमधील दोन प्रवाशांच्या आसनावर एकाच प्रवाशास प्रवास करता येईल. महाव्यवस्थापक कार्यालयाने निश्‍चित केलेल्या आसनव्यवस्थेतील आसनेच आरक्षणासाठी उपलब्ध असतील, असे एस. टी. महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी विभागीय नियंत्रकांना पाठविलेल्या पत्रातून स्पष्ट केले आहे. 

...तर प्रवास करता येईल 

सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. कुटुंब प्रवास करीत असताना एकत्र प्रवास करण्याचा आग्रह केल्यास त्यांना सोबत प्रवास करण्याची सुविधा महामंडळाने पुरविली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT