husband-beats-his-wife 
विदर्भ

पत्नी मोबाईलवर बोलते म्हणून पतीने बघा काय केले!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : दिवसेंदिवस कुटुंब कलहाचे प्रमाण वाढत आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून पती-पत्नींमधील वाद विकोपाला जात असून याचे पर्यावसन विभक्त होण्यात होत आहे. अगदी अशाच प्रकारची घटना अकोल्यातील जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पत्नी तिच्या बहिणीसोबत सतत फोनवर बोलते. हा राग मनात धरून पतीने पत्नीवर चक्क ब्लेडनेच वार केले. 


जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 27 वर्षीय विवाहितेने जुने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, ‘पती मोइन खान मुस्तफा खान हे शुल्लक कारणावरून मारहाण करतात. आई व बहिणीसोबत बोलायलाही मनाई करतात. मंगळवारी (ता.7) सकाळी दहा वाजता पती भाजीपाला घेवून घरी आले तेव्हा माझी बहीण शाहीस्ता परवीन हिचे सोबत फोनवर बोलत होती.

पतीने मला फोनवर बोलताना पाहिले तेव्हा त्यांनी मला विचारले ‘किससे बात कर रही है’ तेव्हा मी त्यांना सांगितले ‘मेरी बहन शाहीस्ता से बात कर रही हूं’ असे म्हणताच पतीने थापडा बुक्यांने मारहाण केली व दोन्ही हातावर ब्लेडने वार केले. तेव्हा सासू हसीनाबी हीने मला पकडून ठेवले होते व ननंदेनेही झाडूने मारहाण केली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी पती, सासू व नंणदेविरुद्ध भादंविचे कलम 323, 324, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: एकीकडे टेस्लाची मुंबईत धमाकेदार सुरुवात; तर दुसरीकडे इलॉन मस्कवर पडला पैशांचा पाऊस

Hutatma Express:'हुतात्मा एक्स्प्रेसने दरवर्षी दहा लाख नागरिकांचा प्रवास'; सोलापूर-पुणे मार्गावर २४ वर्षांपासून सेवा

Pune Crime : तुमची लायकी नाही...भावी पोलिसांना गावगुंडांची बेदम मारहाण; पुण्यातील तळजाई टेकडीवर नेमकं काय घडलं?

Pune News: अवजड वाहनांची धोकादायक वाहतूक; अपघातांचे सत्र , मुंढवा, मांजरी, वाघोली, महंमदवाडीतील प्रकार

LA 2028 Olympics Schedule : ऑलिम्पिकचं वेळापत्रक जाहीर! क्रिकेट, हॉकीसह कोणत्या स्पर्धा कधी, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT