husband murder by wife in bhandara 
विदर्भ

अखेर तरुणाच्या मृत्यूचा उलगडा, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला खून

मुनेश्‍वर कुकडे

भंडारा :  कोरंभीदेवी येथील नदीपात्रात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळेल्या तरुणाच्या मृत्यूचा अखेर उलगडा झाला आहे. अनैतिक संबंधात अडथळा येत असल्याने पत्नीने तिच्या प्रियकरासह कट रचून पतीचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. नंदकिशोर सुरजलाल रहांगडाले (वय 34, रा. नवाटोला ता. गोरेगाव, जि.गोंदिया), असे मृताचे नाव आहे. भंडारा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.    

कोरंभीदेवी येथील नदीपात्रात गुरुवारी (ता.10) पोत्यात बांधलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक  वसंत जाधव यांनी घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, पोलिस ठाण्याचे पथक पाठवून तपासाच्या सूचना केल्या. तपासात मृतदेहाच्या पॅन्टच्या मागील खिशात मृत व त्याच्या पत्नीचे फोटो तसेच कागदपत्रे आढळली. यावरून मृताची ओळख पटली. नंदकिशोर रहांगडाले हे नाव व गाव लक्षात येताच पथकाने नवाटोला गाव गाठले. तपासात पत्नी संशयाच्या भोवऱ्यात आली. त्यानंतर, गुप्त माहितीनुसार नंदकिशोरच्या पत्नीचे 4 वर्षांपासून सामेश्‍वर पुरणलाल पारधी (वय 39 रा. पाथरी) याच्यासोबत अनैतिक संबंध होते, असे कळले. त्यामुळे पथकाने सामेश्‍वर पारधी याला ताब्यात घेतले. विचारपूस केली असता, त्याने मृताची पत्नी योगेश्‍वरी हिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. नंदकिशोर याला या प्रकाराची माहिती झाल्याने मार्गातील अडथळा काढून टाकण्यासाठी कट रचल्याचे सांगितले. 

कटानुसार, 4 डिसेंबर रोजी वलनी खापरखेडा येथून नंदकिशोर व त्याची पत्नी दुचाकीने नवाटोला येथे जाण्यासाठी नागपूरमार्गे भंडाऱ्यावरून गोरेगाव येथे जात असताना लाखनी-सालेभाट्याजवळ थांबवून आरोपी सामेश्‍वर पुरणलाल पारधी (रा. पाथरी), लेखराम ग्यानीराम टेंभरे (रा. मुंडीपार) हे दोघेही वाहनाने पोहोचले. सालेभाट्याजवळ उभे असलेल्या पतीपत्नीच्या जवळ जाऊन अंधारात नंदकिशोरच्या डोक्‍यावर सळाखीने वार केले. मृत झाल्याचे लक्षात येताच सामेश्‍वर पारधी, लेखराम टेंभरे व योगेश्‍वरी रहांगडाले यांनी नंदकिशोरचा मृतदेह पोत्यात भरला. त्यानंतर कारधा येथील वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलावरून फेकून दिला. या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nursing Student Case : आई-वडील घरी येताच समोर आला धक्कादायक प्रकार; 20 वर्षीय पायलचा दुर्दैवी शेवट, 'नर्सिंग'चे घेत होती शिक्षण

तेजश्रीला लागलं नव्या ट्रेंडचं वेड, सोशल मीडियावर 3D फोटोची भलतीच क्रेझ, फोटो व्हायरल

Solapur Crime : नर्तकी असलेल्या प्रेयसीने भेट न दिल्याने माजी उपसरपंचाने गोळी झाडून संपविले जीवन; नर्तकीविरुद्ध गुन्हा दाखल

Fake Job Scam : बोगस नोकरीची मुलाखत चक्क मंत्रालयात, नागपुरातील तरुणाकडून लाखो रुपये उकळले...धक्कादायक प्रकरण समोर!

Navid Mushrif : नविद मुश्रीफांना शौमिका महाडिकांनी म्हटलं पळपुटे; बहीण-भावाच्या नात्यात दुरावा?

SCROLL FOR NEXT