Nagarsevak 
विदर्भ

वॉर्डात स्वतः क्‍लोरोऑक्‍सिइडची फवारणी करून नगरसेवकानेच निर्माण केला आदर्श 

विनायक रेकलवार

मूल (जि. चंद्रपूर) ः कोरोनाच्या काळात सरकार, प्रशासन, आरोग्य विभाग रात्रंदिवस काम करीत असताना आता लोकप्रतिनिधीही त्यात खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करीत आहेत. येथील प्रभाग क्रमांक तीनचे नगरसेवक प्रशांत समर्थ यांनी आपल्या वॉर्डात स्वत: पाठीवर फवारणी यंत्र घेऊन क्‍लोरोऑक्सिइडची फवारणी केली. त्यांच्या जनतेप्रती असलेल्या कार्यतत्परतेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत  आहे. नगरसेवकाने उचललेले हे पाऊल इतर नगरसेवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे. 

प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वॉर्डाप्रती, प्रभागाप्रती अशी आपल्या कार्याची जबाबदारी ओळखल्यास कोरोनाचा विळखा दूर सारण्यास वेळ लागणार नाही. तसेच वॉर्डावॉर्डातील आरोग्य व स्वच्छता निरोगी राहण्यास मदत होईल. कोरोना काळात नगरसेवक प्रशांत समर्थ यांनी आपल्या प्रभागात 'माझा प्रभाग- माझी जबाबदारी' असा उपक्रम सुरू केला.

शासन, प्रशासन कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर डोळ्यांत तेल घालून काम करीत असताना आपणही यात खारीचा वाटा उचलावा, असे प्रशांत समर्थ यांना वाटत होते. त्यामुळे ते कोरोनाच्या काळात जनतेप्रती सजगता दाखवीत आहेत. 

त्यांच्या प्रभागात निघालेल्या कोरोनाबाधितांच्या घरी स्वत: जाऊन क्‍लोरोऑक्‍सिइडची फवारणी नगरसेवक प्रशांत समर्थ यांनी केली. त्यांच्या या कार्याला सोशल मीडियावर लाईक्स मिळत आहेत. प्रशांत समर्थ हे आपल्या ‘दरार’ मित्र मंडळातर्फे नवनवे उपक्रम राबवीत असतात.

वॉर्डातील समस्या सोडविण्यासाठी नगरपालिका काम करीत असते. मात्र, प्रभागातील नगरसेवकांनीही विविध समस्यांप्रती जागरूकता दाखविल्यास वॉर्डातील विविध समस्या सुटण्यास मदत होईल. स्वच्छ सर्वेक्षण आणि स्वच्छ सुंदर मूल शहरासाठी असे पाऊल उचलणे आता गरजेचे ठरणार आहे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake: नाशिकमध्ये हरसूल परिसरात २४ तासांत चार सौम्य भूकंप, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Nagpur Youth Case : 'बाबा, मी पुलावरून उडी घेतोय...'; वडिलांना फोन केला अन्..., आत्महत्येपूर्वीचा थरार CCTV मध्ये कैद, 25 वर्षीय प्रज्वलनं का उचललं टोकाचं पाऊल?

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महापालिकेत घरफाळा, पाणीपट्टी वाढ होणार, प्रशासनाने सादर केला प्रस्ताव; नगरसेवकांचा थेट विरोध

RBI Assistant Job 2026: RBI असिस्टंट पदासाठी किती मिळतो इन-हँड पगार? जाणून घ्या फायदे आणि निवड प्रक्रिया

T20 World Cup: भारतही नको अन् पाकिस्तानही नकोच! 'या' अटी पूर्ण झाल्या तर सेमीफायनलमध्ये श्रीलंकेला 'होम ॲडव्हांटेज'

SCROLL FOR NEXT