श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : आयकरदात्यांनी चुकीच्या पद्धतीने बनावट कागदपत्रे व जोडपत्रे तयार करून कर वाचविण्याचा प्रयत्न केल्यास, अशा करदात्यांची चौकशी आयकर विभाग करणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास आयकर दात्याला वजावटीस पात्र रक्कम व वाचविलेला कर हे दोन्ही दंड या स्वरूपात द्यावे लागणार असल्याने करदाते व्यापारी, कर्मचारी, पगारी संस्था व कर सल्लागार यांना मोठा भुर्दंड बसू नये, म्हणून यावर्षी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
बहुसंख्य कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता, हाऊस रेंट अलाउन्स (एचआरए) पगाराच्या रचनेचा भाग म्हणून येतो. तथापि, पगाराच्या विपरीत, एचआरए पूर्णपणे करपात्र नाही. विशिष्ट नियम आणि शर्तींच्या अधीन असल्याने, एचआरए भाग आयटीएच्या कलम10 (13ए) अंतर्गत सूट देण्यात आली आहे. करपात्र उत्पन्न येण्यापूर्वी एचआरए सवलतीची रक्कम उत्पन्नामधून वजा करता येते. एक कर्मचारी म्हणून हे आपल्याला करांची मोठ्या प्रमाणात बचत करण्याची परवानगी देते. त्यासाठी जमीनदारांचे नाव, भाडेकरूचे नाव, भाड्याच्या घराचा पत्ता, मुक्काम व जमीनदारांच्या स्वाक्षरीसह महसूल मुद्रांक व जमीनमालकाचे पॅन कार्ड सादर करणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक आयकरदाते हे स्वत:चे घर असतानादेखील कर वाचविण्याच्या दृष्टीने एखाद्या घर मालकाची साध्या कागदावरील भाडे पावती जोडतात. तसेच इतर काही कागदपत्रे तयार करून लाभ घेतात. तर व्यापारीही त्यांच्या व्यवसायातंर्गत येणाऱ्या वजावटीसाठीही लागणारी कागदपत्रे व जोडपत्रे ही अस्सल व खरी न जोडता लाभ घेतात, ही बाब आयकर विभागाच्या लक्षात आल्याने सर्वांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
हेही वाचा - मन सुन्न करणारी घटना : आई-वडिलांनी टोकाच्या निर्णयात मुलीलाही घेतले सोबत; जड मनाने घेतली नदीत उडी
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने बनावट कागदपत्रे व जोडपत्रे बनवून कर वाचविण्यावर चाप बसविण्यासाठी नुकतेच काढलेल्या अधिसूचनेमधील सेक्शन 271 एएडी प्रमाणे काही सुधारणा सुचविल्या आहेत. त्यामध्ये कर चुकविण्यासाठी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे व जोडपत्रे बनवून कर वाचविला तर अशा करदात्यांची चौकशी अधिकारी चौकशी करणार असून चौकशीमध्ये दोष आढळल्यास अशा करदात्यांकडून कोणतेही भाडे भरले नसेल तर प्राप्त झालेला एचआरए व वाचविलेल्या कराची रक्कम या स्वरूपात भुर्दंड बसू शकतो. यामुळे संबंधित व्यापारी, करदाते, पगारी संस्था व कर सल्लागार यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
आयकर विभागाने नुकतीच एक अधिसूचना काढली आहे. गैरमार्गाने कर वाचविण्याचा प्रयत्न केला तर करदाते, पगारदार संस्था व कर सल्लागार यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे कर वाचविताना योग्य ती खबरदारी घ्यावी.
-विनोद पनपालिया, कर सल्लागार, पुसद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.