insects attack on toor crop in wardha 
विदर्भ

५५ हजार हेक्टरवरील तुरीचे पीक संकटात, ढगाळ वातावरणामुळे तुरींच्या शेंगावर किडीचा प्रादुर्भाव

रूपेश खैरी

वर्धा : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने तूर पिकांवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. शेतकरी उपाययोजना म्हणून तुरीवर महागड्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. पण तरीसुद्धा अळ्यांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभागाने तत्काळ बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. 

जिल्ह्यातील शेतकरी आंतरपीक म्हणून कपाशी व तूर पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. जिल्ह्यात 55 हजार हेक्‍टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. तुरीचे पीक बहरले असून त्याला फुले आली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तसेच काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. हिरवी अळी तीन ते चार इंचाची असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.  

यंदा कापूस, सोयाबीन पीक कीडरोगाने हातचे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांवर भिस्त आहे. जिल्ह्यातील शेतकरी आंतरपीक म्हणून तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. शिवाय हे पीक कमी खर्चाचे असून हमखास उत्पन्न देणारे आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे जास्त जमीन आहे, ते शेतकरी तुरीचीच पेरणी करतात. 

ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर अळींचा प्रादुर्भाव वाढला असून फुले करपत आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे शेतकरी बोलत आहेत. सद्य:स्थितीत शेतकरी तुरीवर महागड्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहे. कृषी विभागाने वेळीच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. 

सद्य:स्थिती पाहता तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या  अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रतिहेक्‍टर 20 पक्षी थांबे उभारावेत. निंबोळी अर्क पाच टक्‍केची फवारणी करावी. कीड आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आल्यास ईमामेक्‍विंटन बेंझोएट पाच टक्‍के एस. जी. तीन ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. 
- डॉ. प्रशांत उंबरकर, कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा

ढगाळ वातावरणामुळे हिरवी अळी तूर पिकांवर आली आहे. अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डायमेथोएट, क्विनॉलफॉस किंवा क्‍लोरोफॉस 20 मिलि प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून तूर पिकावर फवारणी करा. 
-अनिल इंगळे, जिल्हा कृषी अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT