insects attack toor crop in wardha
insects attack toor crop in wardha 
विदर्भ

सोयाबीन, कापसापाठोपाठ तुरही धोक्यात; शेंगा पोखरणाऱ्या अळीचा हल्ला

रूपेश खैरी

वर्धा : शेतकऱ्यांवर सुरू असलेली संकटांची मालिका काही त्याची पाठ सोडत नसल्याचे दिसून आले आहे. यंदाचा खरीप हंगाम हातून गेल्याचे चित्र आहे. त्यातच आता सोयाबीन पाठोपाठ तुरीवरही शेंगा पोखरणारी अळी आल्याने उत्पादन जाण्याची वेळ आली आहे. तुरीला बाजारात उत्तम भाव मिळण्याची अपेक्षा असताना शेतकऱ्यांवर संकटाचे सावट कायम आहे. 

यंदाच्या हंगामात सोयाबीनवर आलेल्या खोडकिडीमुळे उत्पादनात कमालीची घट झाली. यातही त्यांच्याकडे सोयाबीन होते त्यांना उत्पादनाची आशा होती. पण अवेळी आलेल्या पावसामुळे त्यांचे ते स्वप्नही धुळीस मिळाले. ज्या शेतकऱ्यांना एकरी सहा ते सात पोते सोयाबीन व्हायचे त्या शेतकऱ्यांना एकरी 50 ते 60 क्‍विंटल सोयाबीन झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या. वर्ध्यात खोडकिडीमुळे सोयाबीन उत्पादकांना तब्बल 80 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. 

हीच अवस्था कपाशीची आहे. कपाशीचे उत्पादन होईल, असे वाटत असताना यावर अचानक बोंडअळीने हल्ला चढविला. यामुळे कपाशीच्या उत्पादनात घट होणे निश्‍चित झाले आहे. यातही आलेल्या परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस शेतात ओला झाला. त्या कापसाला भाव मिळाला नाही. यामुळे यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी तोट्याचाच अधिक ठरल्याचे दिसून आले आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या नजरा शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत. 

आता आशा रब्बीवरच - 
खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकऱ्यांची आशा आता रब्बीवर आली आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांची आशा रब्बीवरच आहे. असे असले तरी कोरडवाहू शेतकऱ्यांची मात्र पंचाईत झाली असून त्यांना शासनाने मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Results: नरेंद्र मोदी जवाहरलाल नेहरुंच्या विक्रमाची बरोबरी करणार? ठरणार दुसरे पंतप्रधान?

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

India Lok Sabha Election Results Live : दिल्लीच्या भाजप कार्यालयात गोडधोड पदार्थांची रेलचेल

Lok Sabha Election Result 2024 : आठ हजार जणांचे भवितव्य आज ठरणार

National Cheese Day 2024: राष्ट्रीय चीज दिवस का साजरा केला जातो, जाणून महत्व आणि इतिहास

SCROLL FOR NEXT