Irfan Sheikh Mastermind Umesh Kolhe murder Amravati police custody July 7
Irfan Sheikh Mastermind Umesh Kolhe murder Amravati police custody July 7 Irfan Sheikh Mastermind Umesh Kolhe murder Amravati police custody July 7
विदर्भ

उमेश कोल्हे खुनाचा सूत्रधार इरफान शेखला ७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : अमरावतीमधील बहुचर्चित उमेश कोल्हे हत्याकांडातील फरार आरोपी शेख इरफान शेख रहीम (३२, रा. कमेला ग्राऊंड, अमरावती) याला अमरावती पोलिसांनी शनिवारी (ता. २) नागपुरातून अटक केली होती. त्याला रविवारी (ता. ३) न्यायालयात हजर केले असता गुरुवारपर्यंत (७ जुलै) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भाजपच्या (BJP) वादग्रस्त प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे अमरावतीमधील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांनी समर्थन केले होते. नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर उमेश कोल्हे यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यानंतर २१ जून रोजी दुचाकीने आलेल्या आरोपींनी चाकूने भोसकून कोल्हे यांची हत्या (murder) केली होती.

याप्रकरणी अमरावती (Amravati) पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली होती. सातवा आरोपी शेख इरफान हा फरार होता. तो शहर सोडून दुसऱ्या शहरात गेल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती. इरफान नागपुरात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळताच नागपुरात पोलिसांनी सापळा रचला आणि मोठ्या शिताफीने इरफानला अटक केली.

इरफानला सायंकाळी अमरावतीला नेण्यात आले. शेख इरफान हा स्वयंसेवी संस्था चालवीत होता. मुख्य आरोपी शमीम आणि त्याच्या मित्रांना इरफाननेच प्रोत्साहन दिले होते. आरोपींना काही रुपये आणि कार उपलब्ध करण्याची मदत करण्याचे आश्वासन दिले होते. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता गुरुवारपर्यंत (७ जुलै) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT