ISIC hospital in Amravati off from last 8 months  
विदर्भ

गरिबांना उपचार मिळणार कधी? गेल्या ८ महिन्यांपासून अमरावतीच्या विमा रुग्णालयात तपासणी बंद 

संतोष ताकपिरे

अमरावती ः येथील राज्य कामगार विमा दवाखान्यामध्ये येणाऱ्या रुग्णांची हेळसांड अद्याप सुरू आहे. मागील आठ महिन्यांपासून या रुग्णालयाचे दार बंदच आहे. येणाऱ्या रुग्णांची खिडकीच्या बाहेरूनच चौकशी केली जाते. आरोग्य सुविधा घेण्यासाठी येणाऱ्यांच्या तपासणीला तर एकप्रकारे ब्रेक बसल्याचे दिसून येत आहे.

मोठे उद्योगसमूह, मॉल, कंपन्यांमध्ये हजारो कामगार काम करतात. अमरावती जिल्ह्यातसुद्धा अशा उद्योगाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एकवीस हजार रुपयापर्यंत ज्या कामगारांना वेतन मिळते, अशा कामगारांच्या वेतनातून राज्य शासन महिन्याला काही टक्के रक्कम इएसआयसीच्या हेडअंतर्गत कपात करते. .

ही रक्कम ज्या कामगारांच्या वेतनातून कपात होते, त्या कामगारांसह त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना राज्य कामगार विमा दवाखान्यातून प्राथमिक तपासणी, औषधे वितरित होतात. शिवाय इएसआयसीच्या पॅनलवर शहरातील काही मोठी अत्याधुनिक रुग्णालये आहेत. अशा रुग्णालयांतसुद्धा रेफर केले जाते. कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर सुरक्षित अंतर ठेवून रुग्णांची तपासणी करण्याचे काम राज्यात विविध शासकीय रुग्णालयांत केले जाते. परंतु अमरावतीच्या कामगार विमा दवाखान्यात सुरक्षिततेच्या नावाखाली मुख्य प्रवेशद्वारच आठ महिन्यांपासून बंद करण्यात आले. 

जे रुग्णालय कामगारांसाठी निर्माण झाले, त्याच रुग्णालयात कामगारांना बाहेर राहण्याची वेळ आली. येथे येणाऱ्या रुग्णांना बाहेर खिडकीच्या समोर उभे केले जाते. आत बसलेले डॉक्‍टर बाहेर रांगेत उभ्या रुग्णांसोबत संवाद साधतात. त्यामुळे रुग्णांना मोकळेपणाने डॉक्‍टरांशी संवाद साधता येत नाही. आवश्‍यक औषधी लिहून दिली जाते. गरज भासल्यास संलग्नित रुग्णालयाचे रेफर लेटर दिले जाते. औषधांचे वाटपही बाहेरूनच होते.

महिलांची होते कुचंबणा

राज्य कामगार विमा दवाखान्यात तपासणीसाठी गर्भवती महिला येतात. खिडकीच्या बाहेर पुरुष आणि महिलांची रांग एकच असल्यामुळे अशा महिला रुग्णांना पुरुषांसमोर डॉक्‍टरांसोबत संवाद साधताना अडचणी येतात. रुग्णालयाच्या बाहेर बसण्यासाठी बेंचही उपलब्ध नाहीत. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT