it is important to find super spreader of corona  
विदर्भ

कोरोनाच्या सुपर स्प्रेडर व्यक्तींचे सर्वेक्षण आवश्यक; क्षेत्रीय पातळीवर टीम

सूरज पाटील

यवतमाळ : व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने काही व्यक्तींचा जनसंपर्क अधिक लोकांशी येतो. त्या माध्यमातून कोविड आजाराचा प्रसार अधिक वेगाने होतो. हे अभ्यासातून पुढे आले आहे. दुसऱ्या लाटेत स्प्रेडर व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हे लक्षात घेऊन सुपर स्प्रेडरचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

किराणा दुकानदार, भाजीपालाविक्रेते, दूधविक्रेते, मोलकरणी, सिलिंडर वाटप करणारे, वीजदुरुस्ती, नळजोडणी, मालवाहतूक करणारे चालक, रिक्षाचालक, हमाली काम, रंगकाम, बांधकाम करणारे मजूर, सुरक्षारक्षक, आवश्‍यक सेवा पुरविणारे शासकीय, नीमशासकीय कर्मचारी, पोलिस, होमगार्ड आदींचा सुपर स्प्रेडरमध्ये समावेश होतो. 

अशा व्यक्तींच्या विशेष सर्वेक्षणावर भर राहणार आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी मोठ्या प्रमाणावर रुग्ण हे घरगुती विलगीकरणात असतात. या रुग्णांचे व्यवस्थापन प्रभावीपणे होण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर पथके कार्यरत राहणार आहेत. या पथकांकडून घरगुती विलगीकरणात असलेल्यांचे मॉनिटरींग करणे अपेक्षित आहे. सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी त्यातील प्रत्येकाचे सखोल कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग करणे आवश्‍यक आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार निकटवासितांची प्रयोगशाळा तपासणी करण्याचे निर्देश आरोग्यसेवा संचालकांनी दिले आहेत.

क्षमतासंवर्धन व प्रशिक्षण

कोविड सर्वेक्षण, क्‍लिनिकल मॅनेजमेंट यासंदर्भात यापूर्वीच सर्व संबंधितांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नव्याने समोर येणाऱ्या बाबी, क्‍लिनिकल प्रोटोकॉलमधील बदल यासाठी कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुनः:प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

कोविड उपचाराची जबाबदारी

सध्या शहरी व ग्रामीण भागात कोविडचे रुग्ण कमी होताना दिसत आहेत. अशापरिस्थितीत कोविड व नॉनकोविड रुग्णसेवेचा ताळमेल ठेवण्यासाठी रुग्णव्यवस्थेसंदर्भात काही निर्णय घेण्याचे निर्देश आहेत. जिल्ह्यात रुग्णसंख्येच्या प्रमाणानुसार कोविड उपचाराची जबाबदारी जिल्हा व शहरातील विशिष्ट रुग्णालयांवर राहणार आहे. जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये यांसारख्या रुग्णालयांमध्ये कोविड, नॉन कोविड रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून समतोल राखला जाणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT