file photo
file photo 
विदर्भ

जितू बडे हत्याकांड; पाच आरोपींना अटक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भाजयुमोचा युवा कार्यकर्ता जितू बडे हत्याकांडानंतर उदयनगरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. त्यामुळे हुडकेश्‍वर पोलिसांनी परिसरात तगडा बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. या हत्याकांडात मुख्य आरोपी प्रसाद रोकडेसह पाच आरोपींना हुडकेश्‍वर पोलिसांनी अटक केली. आज पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना चार दिवस (ता. 2) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता जितू वासुदेवराव बडे (वय 29, संजय गांधीनगर) याचा आणि अन्य गटातील प्रसाद रोकडे याचा पैशाचा वाद होता. तसेच एका शुभेच्छांचे पोस्टर फाडल्यावरून संघर्ष सुरू होता. रविवारी मध्यरात्री जितू बडे हा मित्र रितीक डेंगे आणि अभिजित खरात यांच्यासोबत उदयनगर चौकात उभे होते. त्यांनी पोस्टर फोडल्याची माहिती मिळताच प्रसाद रोकडे व त्याचे साथीदार सुमित दहने, रोहन राऊत, अभिषेक डोईफोडे आणि अनिमेश तागडे आणि अन्य दोन युवकांसह तो दुचाकीने उदयनगर चौकात पोहोचला. जितू आणि प्रसाद यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. प्रसादने टोळीच्या मदतीने भरचौकात जितूचा चाकूने भोसकून खून केला. या हत्याकांडानंतर युवा वर्ग मोठ्या प्रमाणात गोळा झाला. या हत्याकांडाला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न झाला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी प्रसाद रोकडेला अटक केली होती तर अन्य चौघांना रात्री उशिरा अटक केली होती. तर अर्चित नरेश भावे (वय 23, रा. पुनापूर रोड, पारडी) याला कामठीतून परिमंडळ पाचच्या पथकाने अटक केली. 

गटात संघर्ष पेटण्याची शक्‍यता 
जितू बडे हत्याकांडानंतर हुडकेवरमध्ये दोन गट आक्रमक झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गटांत येत्या काळात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. आरोपींची संख्या सध्या सहापर्यंत पोहोचली असून, या हत्याकांडात आरोपींची संख्या आणखी वाढणार आहे. हुडकेश्‍वर पोलिस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. 

आरोपींचा सीडीआर निघणार 
जितू बडे हा मामेभाऊ गोलू खरातसोबत गप्पा करीत अंगणात बसला होता. त्याला कुणीतरी फोन करून उदयनगर चौकात बोलावले. त्याला बोलविण्यापूर्वीच "गेम' करण्याची प्लानिंग झाली होती. उदयनगरात आल्यानंतर वाद घालून जितूचा मामेभावासमोरच खून करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT