cow
cow e sakal
विदर्भ

म्हाताऱ्या गाईंचे संगोपन करणारी जोडमोहा गोशाळा, १९०७ पासून सेवा

चेतन देशमुख

यवतमाळ : दुधाळ गाई (cow) तसेच उत्पन्न देणार्‍या जनावरांचे संगोपन अनेकजण करतात. जनावरं म्हातारे झाले, अपंगत्व आले तर अशा जनावरांची तितकी काळजी घेतली जात नाही. याउलट श्री खटेश्‍वर संस्थान (goshala) अंध, म्हातारे तब्बल 175 पेक्षा जास्त देशी गाईंचे संगोपन करीत आहे. अशा पद्धतीने सेवा करणारी राज्यातील ही एकमेव संस्था असल्याचं सांगितलं जातं. (jodmoha goshala take care of old and injured cows from 1907 in yavatmal)

प्राणीमात्राप्रती सेवाभाव जागृत करणारे विचार ज्वालाप्रसाद यांनी जोडमोहा परिसरातून रुजवायला सुरुवात केली. ते जेथे-जेथे जायचे तेथे खाटेवर बसून ते प्रबोधन करायचे. लुळे, पांगळे व्याधीग्रस्त अशा ‘खट्या‘जनावरांची सेवा करायचे. म्हणून खटेश्वर महाराज या नावाने ते ओळखले जाऊ लागले. त्यांनी साधारणत: 1907 मध्ये सुरू केलेली गोसेवा आजही जोडमोहा येथे सुरू आहे. अंध, म्हातारे, भाकड तसेच खट्या झालेल्या गाई अनेकजण विकायचे. काहीजण ते मोकाट सोडून द्यायचे. मात्र, अशा देशी गाईंचे संगापन करण्याची सुरुवात खटेश्‍वर महाराज यांनी केली. तेव्हापासून याठिकाणी असलेल्या गोशाळेत गाईंचे संगोपन केले जाते. आजही खटेश्वर हे देवस्थान महाराजांच्या तत्त्वावर चालत आहे. इथे धार्मिक कार्यक्रमांपेक्षा सेवाभावी कार्याला अधिक महत्त्व आहे. दिव्यांग, जखमी, व्याधीग्रस्त गोवंश, कुत्री, कावळे, चिमण्या व पक्षी यांची सेवा केली जाते. सध्या गोशाळेत 170 पेक्षा जास्त देशी गाई आहेत. त्यांची सेवा संस्थानतर्फे केली जाते. विशेष म्हणजे, या ठिकाणी गाईचे दूध हे पिलांसाठी आहे. जी जनावरे कत्तलखान्यात जायची ती देवस्थानात आणून त्यांची निगा राखली जाते. ‘खट्या’देशी गाईचे संगोपन करणारी एकमेवच संस्था आहे. या ठिकाणी देशी गाईंची विशेष काळजी घेतली जाते. त्यांना लागणार्‍या चारापाण्याची व्यवस्था संस्थांनतर्फे केली जाते.

देशी गाईची संख्या कमी होत आहे. त्यामुळे त्यांच्या संगोपनांची गरज आहे. महाराजांनी दिलेल्या शिकवणीनुसार आजही गोसेवा सुरू आहे. सध्या 170 पेक्षा जास्त गाई आहेत. त्यांची काळजी आम्ही घेतो.
-नंदकुमार कुक्कुलवार, प्रभारी, श्री खटेश्‍वर संस्थान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT