विदर्भ

'दुर्गबंदी’च्या जंगलात दडलाय गोंडराजाचा इतिहास! अभ्यासकांचा दावा

चेतन देशमुख- सकाळ वृत्तसेवा

यांचा संदर्भ घेऊन गेल्या ३२ वर्षांपासून या ठिकाणचा अभ्यास करणारे काका चिलगलवार हे पाठपुरावा करीत आहेत. या ठिकाणी उत्खनन झाल्यास गोंडराजा व जगधामी (दुर्गा) मातेचे भव्यदिव्य मंदिर असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.

यवतमाळ : कळंब (Kalamb)शहरापासून काही अंतरावर असलेल्या दुर्गबंदीच्या जंगलाचा (durgbandi forest) इतिहासही आता समोर येत आहे. कळंब येथे गोंडराजाचा किल्ला (Gondaraja fort) होता, तर दुर्गबंदी जंगलात राजाश्रय असलेले जगधामी माताच्या मंदिराचा उल्लेख जुन्या पुस्तकात आहे. यांचा संदर्भ घेऊन गेल्या ३२ वर्षांपासून या ठिकाणचा अभ्यास करणारे काका चिलगलवार हे पाठपुरावा करीत आहेत. या ठिकाणी उत्खनन झाल्यास गोंडराजा व जगधामी (दुर्गा) मातेचे भव्यदिव्य मंदिर असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. (kaka chilgalwar says that there is a history of gondaraja in the durgbandi forest)

कळंबचा चिंतामणी इंद्रदेवाने स्थापिला असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे हा परिसर पुरातन व ऐतिहासिक असल्याचे अनेक संदर्भ वेगवेगळे ग्रंथ, इतिहासांच्या पुस्तकांत आहेत. कळंब जवळच असलेले निरंजन माहूर दतात्रेयाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. अशातच आता कळंबपासून सहा ते सात किलोमीटर अंतरावरील वनविभागाच्या जोडमोहा रेंजमधील ‘दुर्गबंदी’चा इतिहास समोर येत आहे. वयाची ८१ वर्षे गाठलेले व व्यवसायाने छायाचित्रकार असलेले काका चिलगलवार यांनी यासंदर्भातील अनेक मुद्दे समोर आणले आहेत.

त्यांच्या मते, दुर्ग येथे गोंडराजाचा किल्ला होता. तो युद्धात पडला. कळंबवर मोगल सुलतानांनी आक्रमण केले. त्यात कत्तली, अत्याचार, लुटालूट करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला. या ठिकाणी असलेले मात जगधामीचे शिल्पकलेने परिपूर्ण असलेले पीठ होते. ते अत्यंत पद्धतशीरपणे मोठमोठ्या शिळांनी झाकण्यात आले. चंद्रपूरचा इतिहास या पुस्तकांत निरंजन माहूरजवळ दुर्गेचे देऊळ असल्याचा उल्लेख आहे. याशिवाय मोरेश्‍वर कुंठे लिखित दस्तऐवजात कळंबजवळ दुरुग आहे. येथे भवानीचे हेमांडपंती मंदिर असल्याच्या नोंदी सापडतात. त्यामुळे अशा जागृत व ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणाचे उत्खनन व्हावे, अशी मागणी चिलगलवार यांनी केली आहे.

गेल्या ३२ वर्षांपासून या ठिकाणचा अभ्यास मी केला. अनेक संदर्भ शोधलेत. त्यात काही ऐतिहासिक पुस्तकांत संदर्भ सापडले आहेत. याचा पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन वनविभागाचे अधिकारी व पुरातत्त्व विभागाचे संचालक यांनी भेटी दिल्या. त्यावेळी त्यांनी या ठिकाणी देवस्थान असल्याचे मान्य केले. या ठिकाणी उत्खनन झाल्यास मोठा ऐतिहासिक ठेवा समोर येईल.

- काका चिलगलवार, अभ्यासक.

दुर्गबंदी जंगलांशी संबंधित निवेदन माझ्याकडे आले होते. त्यावर संबंधित अधिकाऱ्‍यांना अहवाल मागितला आहे. त्यानंतर पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार करू. पुरातत्त्व विभागाच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

- केशव वाबळे, उपवनसंरक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT